एक्स्प्लोर

Who is Shah Wali Khan : टायगर मेमनचा हस्तक, मुंबई स्फोटातील बिनीचा शिलेदार, कोण आहे सरदार शाह वली खान?

Who is Shah Wali Khan : देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर पलटवार करत पत्रकार परिषदेतून अनेक गौप्यस्फोट केलेत. यामध्ये त्यांनी दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिकांनी जमीन विकत घेतल्याचं म्हटलंय.

Who is Shah Wali Khan : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर थेट निशणा साधला आहे. आज बोलताना फडणवीसांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर  पलटवार केला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. याबाबत बोलताना फडणवीसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या दोन निकटवर्तींयाचाही उल्लेख केला. एक म्हणजे, सरदार शाह वली खान आणि दुसरा दाऊदची बहिण हसीना पारकरचा चालक मोहम्मद सलीम पटेलचा. यातील सरदार शाह वली खान म्हणजे, 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार. जाणून घेऊया नेमका कोण आहे सरदार शाह वली खान. 

देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सरदार शाह वली खान. हा 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिका, या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यानं केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे जे कारस्थान शिजलं, त्या बैठकांनाही सरदार शाह वली खान उपस्थित होता. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं होतं, त्यामध्येही शाह वली खान सहभागी होता. माहिमच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये टायगर मेमनच्या घरी आरडीएक्स भरण्यातही त्याचा सहभाग होता. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला होता. त्यामुळे त्याला जन्मठेप झाली आहे. सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे."

कुर्ल्यात तीन एकर जमीन 30 लाखांत कशी घेतली? फडणवीसांचा मलिकांना प्रश्न

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडतं मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिक यांनी गुन्हेगाराकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून तीन एकर जमीन फक्त 30 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊद यांच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. हे दोघेही 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी फक्त तीस लाख रुपयांत जागा विकत घेतली. याचे पुरावा शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. आपले मंत्री काय करतात हे पवारांनाही कळू द्या, असंही ते म्हणाले.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget