एक्स्प्लोर

कुर्ल्यात तीन एकर जमीन 30 लाखांत कशी घेतली? फडणवीसांचा मलिकांना प्रश्न

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडतं मोठा बॉम्ब फोडला आहे.

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडतं मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिक यानी गुन्हेगाराकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलाय.  मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून तीन एकर जमीन फक्त 30 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊद यांच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. या दोघांवनर 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी फक्त तीस लाख रुपयांत जागा विकत घेतली. याचे पुरावा शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. आपले मंत्री काय करतात हे पवारांनाही कळू द्या, असेही म्हटलेय. 

मुंबईला घायाळ करणाऱ्या गुन्हेगाराकडून जमीन विकत कशी घेतली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केल. फक्त ही एकच नाही. अन्य चार मालमंत्तामध्ये अंडरवर्डचा सहभाग आहे. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. त्यामुळेच प्राईम लोकेशनची जमीन मलिकांना स्वस्तात मिळाली. ही जमीन विकत घेताना स्टॅम्प ड्युटींमध्येही घोटाळे झाल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिकही पत्रकार परिषद घेणार आहेत. फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला नवाब मलिक काय प्रत्युत्तर देतायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी एक घोषणा केली होती. काही गोष्टी दिवाळीनंतर मी तुम्हा सर्वांसमोर मांडेल. पण काहीसा उशीर झाला. कागदही गोळा होत होते. काही लोकांच्या पत्रकार परिषदांचे दिवस आधीच बुक होते. म्हणून मला थोडासा वेळ लागला. मी जे सांगणार आहे तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. सर्वात आधी मी दोन पात्रांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे, सरदार शहाब अली खान. हे 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा? या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हे सहभागी होते."

फडणवीसांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

टाडाच्या आरोपींकडून एखाद्या मंत्र्यानं जमीन कशी विकत घेतली?

फक्त एकच नाही, तर चार जागांमध्ये अंडरवर्ल्डचा संबंध

स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठीही घोटाळा

मलिकांचे अंडर्ल्डशी संबध, शरद पवारांकडे पुरावे देणार

मलिकांशी वैयक्तिक दुश्मनी नाही

शाह अली खान आणि सलीम पेटल 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी

बॉम्बस्फोट आरोपीकडून मलिकांनी जमीन स्वस्तात खरेदी केली

पुराव्याशिवाय बोलत नाही

मुंबईला घायाळ करणाऱ्यांकडून जमीन कशी विकत घेतली?

महत्त्वाच्या बातम्या

नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget