देवेंद्र फडणवीसांनी CDRची माहिती तपास यंत्रणांना द्यावी; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी
मनसुख हिरण प्रकरणातील सिडीआर हा महत्वाचा पुरावा असलेला फडणवीस यांनी तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सिडीआर मिळवणे हा गुन्हा आहे. नागरिक म्हणून तपास यंत्रणांना सोर्स सांगणं हे गृहमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तव्य आहे, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण समोर आल्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी सचिव वाझे आणि मनसुख हिरण यांचे कधी कधी बोलणे झाले याचा सिडीआर सभागृहात मांडला होता. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केला होता की, विरोधी पक्षांकडे हा सिडीआर कुठन आला? त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला आव्हान दिले होते की, माझी चौकशी करा. याप्रकरणी आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, मनसुख हिरण प्रकरणातील सिडीआर हा महत्वाचा पुरावा असलेला फडणवीस यांनी तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी केली आहे.
मनसुख हिरण प्रकरणातील सिडीआर हा महत्वाचा पुरावा असलेला फडणवीस यांनी तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सिडीआर मिळवणे हा गुन्हा आहे. नागरिक म्हणून तपास यंत्रणांना सोर्स सांगणं हे गृहमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तव्य आहे, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सचिन सावंत म्हणाले की, "कायदा हा सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणले होते. त्यामुळे सामान्य लोकांना एक न्याय आणि विरोधी पक्ष नेत्यांना दुसरा न्याय हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, गृहमंत्री पदावर राहिलेले आहेत. त्यामुळे जबाबदार असल्याने त्यांनी आपल्याकडील माहिती तपास यंत्रणांना द्यावी." पुढे बोलताना ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे कायद्याच्या चौकटीत बसतात, त्यांनी या प्रकरणातील सर्व माहिती तपास यंत्रणांना देऊन जनतेसमोर योग्य आदर्श घालून दिला पाहिजे." असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला आहे.
दरम्यान, एकूणच एकीकडे सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सिडीआर प्रकरणी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सचिन वाझेंनी जप्त केलेले पुरावे रेकॉर्डवर नाहीत?
सचिन वाझे यांनी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्ड्स, सीसीटीव्हा फुटेज जप्त केले होते. मात्र या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसुख हिरण प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुकानदाराने वाझे आणि त्याच्या पथकाने दुकानातील CCTV, डीव्हीआर मशीन, रेकॉर्ड नेल्याचे कबूल केलं आहे. या संपूर्ण घटनेची आता गंभीर दखल ही घेण्यात आली असून या प्रकरणी CIU च्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरु आहे. तर काही बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांची चर्चाही रंगली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :