एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway : समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!

Samruddhi Highway : समुद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर आता राज्यात शक्तिपीठ महामार्गाच्या उभारणीला वेग येण्याची शक्यता आहे. 

मुंबई : नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास करणं आता शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानं नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. यानंतर आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाला. आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणार असून त्यामुळे मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग तीन शक्तिपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक ठिकाणांना जोडणारा असेल.

Shaktipeeth Expressway : कसा असेल शक्तिपीठ महामार्ग? 

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.

कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ,  हिंगोली जिल्ह्यातील  औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.  

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

2014 ला आम्ही जे स्वप्न बघितले त्याची पूर्तता आज होते आहे. हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. महाराष्ट्राचे 24 जिल्हे जेएनपीटी सोबत कनेक्टेड आहेत. ते वाढवण सोबत आम्ही जोडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्याचे, दादा भुसे यांनी तिसऱ्या टप्प्याचे तर मी याच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करत आहे.  या महामार्गावर 73 पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये यासाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवले आहेत. 

शेवटचा टप्पा 76 किमी आहे. यामध्ये 5 जुळे बोगदे आहेत. हा सर्वात जास्त लांबीचा हा बोगदा आहे. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात 200 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील. 

हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक 10 लाख प्रति महिना सुरू आहे. ती आधी 2 लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल. वाशीच्या पुलावर ट्रॅफिक जॅम होते. ते कमी करण्यासाठी वाशीच्या पुलाचे लोकार्पण करत आहोत. 

जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांना वाटत होते की हे काम होणार नाही. पण आम्ही ते करून दाखवले. महायुतीच्या काळात याचे काम सुरू केले आणि आनंद आहे की महायुतीच्या काळात याचे लोकार्पण केले आहे. यापुढे आपल्याला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. मराठवाड्याचं आर्थिक आणि औद्योगिक चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

आज शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. मी खूप खूप शुभेच्छा देतो. हा देशातला सर्वात जास्त लांबीचा आणि गेम चेंजर प्रकल्प पूर्ण झालेला आहे. हा सगळ्यात कठीण प्रकल्प होता. सुरुवातीला काही लोक हा रस्ता होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. पण मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हा रस्ता करायचा आहे. त्यामुळे विदर्भात देखील औद्योगीकरण होईल. प्रवासाला 18 नाही तर 8 तास लागणार आहेत. 

पर्यावरण पूरक असा हा प्रकल्प आहे. या रस्त्याच्या बाजूला आपण शेततळी केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आपण 11 लाख मोठी झाडे आणि 22 लाख लहान झाडे लावतोय.
पहिल्या टप्प्यावेळी काही लोक घाई करत होते.  औद्योगिक विकासाला चालना देणारा हा रस्ता ठरेल. नागपूरवरून सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल. या आधी तीन दिवसांनी तो पोहोचायचा. 

शक्तिपीठाचा उल्लेख मुख्यमंत्री यांनी केला. मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणाला देखील त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गाला देखील काही राजकीय लोकांनी विरोध केला. पण शेतकऱ्यांना त्याचा आता फायदा झाला.शक्तिपीठ देखील फायद्याचा ठरेल.  

काय म्हणाले अजित पवार? 

हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी विरोध केला. संभाजीनगर ला हॉल मध्ये मीटिंगमध्ये आम्हाला विरोध करायला सांगितला. नंतर ज्यावेळी दर जाहीर केला तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनी जाऊन पैसे घेतले. 55 हजार 500 कोटींची खर्च होता पण बजेट 61 हजारांवर गेले. 12 कोटी सिमेंट बॅग इथे लागल्या आहेत. फार मोठ काम राज्यासाठी झाले आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरवात केली आणि आता ते मुख्यमंत्री असतानाच या रस्त्याचं उद्घाटन झालं, असे क्वचित होतं.एकनाथ शिंदे यांचे योगदान लाभले हे विसरून चालणार नाही.  आमच्या ऑडी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले. 

 

ही बातमी वाचा: 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2025: पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
Manoj Jarange Maratha Morcha LIVE:  मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार,  मराठा बांधव सज्ज
Manoj Jarange LIVE: मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार, मराठा बांधव सज्ज
Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Latur News : मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Chaturthi 2025: पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
Manoj Jarange Maratha Morcha LIVE:  मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार,  मराठा बांधव सज्ज
Manoj Jarange LIVE: मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार, मराठा बांधव सज्ज
Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Latur News : मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?  
Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?  
गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
Embed widget