(Source: Poll of Polls)
12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील, 61 हजार कोटी, समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च अजितदादांनी सांगितला!
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल.

नाशिक : देशातील सर्वात लांब महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट्स असलेल्या समृद्धी महामार्गाचा (Samruddhi mahamarg) 4 था आणि शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात 76 किमी इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले. तब्बल 61 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (76 किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. यावेळी, बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) समृद्धी महामार्गाची उपयुक्तता आणि त्यासाठी लागलेला खर्च, स्टील व सिमेंटची देखील माहिती दिली.
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी विरोध केला होता. छत्रपती संभाजीनगरला हॉलमध्ये मीटिंगमध्ये आम्हाला विरोध करायला सांगितला होता. पण, नंतर ज्यावेळी भूसंपादनाचा दर जाहीर केला तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनीच जाऊन पैसे घेतले, असे अजित पवारांनी सांगितले.
समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 500 कोटींची खर्च अपेक्षित होता. पण, हा खर्च 61 हजार कोटींवर पोहोचला आहे. या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरले आहे. 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे. हा महामार्ग म्हणजे फार मोठं काम राज्यासाठी झालं आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आणि आता ते मुख्यमंत्री असताना उद्घाटन होते असे क्वचितच होते. एकनाथ शिंदे यांचे योगदान लाभले, हे विसरून चालणार नाही. आमच्या ऑडी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले, मी बघत होतो व्यवस्थित आहे की नाही, असा मिश्कील संवाद अजित पवारांनी यावेळी केला. आधी मुख्यमंत्री असणारे आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हे बाबा गाडीवर बसल्यावर चालेल का नाही. मी म्हटलं मला LC द्या, निरंजन डावखरेची होती तो आधीचा राष्ट्रवादीचा असल्याने त्याला म्हटलं दे गाडी, असा आजच्या कार्यक्रमातील मजेशीर किस्सा अजित पवारांनी सांगितला.
120 च्या स्पीडने चालवली गाडी
महामार्गावर कार चालवताना देवेंद्र फडणवीसांनी थेट 120 स्पीड पकडला अनिल गायकवाड यांना विचारलं कितीची वेग मर्यादा आहे, ते म्हणाले 120 आहे बोगद्या आधी, बोगदा आला की 100. मी बघत होतो टनेलमधे आल्यावर किती वेग आहे, तेव्हा 100 च होता. आम्ही सर्व नियमांचे पालन केले आम्ही उतरवलेल्या विम्याचा उपयोग करावा लागला नाही, अशी मिश्कील फटकेबाजी अजित पवारांनी या उद्घाटनानंतर अजित पवारांनी केली.




















