Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटिशीनंतर भाजप आक्रमक, राज्यभर आंदोलनं, नोटीशीची होळी
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलय. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.
Devendra Fadanvis : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. मुंबईसह राज्यभरात भाजपकडून सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात येतेय. नाशिक, बीड, नंदुरबार, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती बुलढाण्यासह यवतमाळमध्येही भाजपकडून सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.
अकोल्यामध्ये भाजपनं आंदोलन करत गांधी चौकातील भाजप कार्यालयासमोर नोटीसची होळी केली आणि भाजप कार्यकर्त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात घोषणा दिल्या. नंदुरबारमध्येही मुंबई पोलिसांच्या नोटीसीच्या निषेधार्थ भाजपकडून निदर्शने करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे घोटाळे बाहेर काढले त्यामुळे राज्य सरकार आता द्वेषाचे राजकारण करून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे, असा आरोप भाजपने केला आहे.
बुलढाणा आणि परभणीत भाजप कार्यकर्ते आक्रमक बघायला मिळाले. परभणीच्या शिवाजी चौकामध्ये भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या
नेतृत्त्वात भाजपने आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली ज्यामुळे हा परिसर दणाणून गेला होता. दरम्यान सरकारची पोलखोल देवेंद्र फडणवीस करत असल्याने त्यांना अशा प्रकारे नोटीस देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आम्ही जशास तसे उत्तर या महाविकास आघाडीला देऊ असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी आता तर एकच बॉम्ब फोडला आहे. त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र असून येणाऱ्या काळात बाहेर निघतील असा दावा भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते नागपुरात भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते.
पोलिसांच्या बदली संदर्भातील अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत नोटीशी होळी आणि मविआ सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Crime : बुरखा घालून करायचा मुलींचा विनयभंग, लोकांनी पकडून केले पोलिसांच्या हवाली
- Corona in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट, जगभरात चिंतेच वातावरण, दोन वर्षांनतर 3 हजार 300 नवे रुग्ण
- Viral Video : आगीपासून वाचवण्यासाठी वडिलांनी मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले, पुढे काय झाले तुम्हीच पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha