जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, आपण निवडणुकीत बाता मारणारे लोक नाहीत : मुख्यमंत्री
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होनार नसल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आपल्याला पारदर्शी कारभार आणायचा आहे. कोणतीही गुंडा गर्दी करायची नाही असे ते म्हणाले. अंबरनाथमध्ये ऐआयोजीत करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपण निवडणूका आल्या की बाता मारणारे लोक नाहीत असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला.
अंबरनाथकरांसाठी 15 डब्यांची लोकल सुरू करणार
अंबरनाथकरांसाठी 15 डब्यांची लोकल सुरू करणार आहोत. 10 ते 15 मिनिटांनी लोकल सेवा उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अंबरनाथ बदलापूरला लोकलच्या प्रवासाची सवय झाली आहे. मी देखील लोकलने प्रवास केला आहे आता सवय राहिली नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
मात्र लोकल सेवा एसी लोकल मध्ये रूपांतर होणार आहे.
देवभाऊ जो बोलता है ओ करता है जो नही बोलता ओ डेफिनेटली करता है
देवभाऊ जो बोलता है ओ करता है जो नही बोलता ओ डेफिनेटली करता है असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेली अनेक वर्षे धरण तीच आहेत. शहराकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्याकडे इरिगेशन होते. मी दोन धरणाच्या मागण्या केल्या आहेत. एमएमआरडीए ला सांगितले दोन्ही धरणाची कामे पूर्ण होतील तीन वर्षांनी धरणातील पाणी प्यायला मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण निवडणूका आल्या की बाता मारणारे लोक नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. एमएमआर क्षेत्रात विकासाचे काम केले जाणार आहे असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान, आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली आहे. सभेच्या काही तास अगोदर बीजेपीचे उमेदवार यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यामुळे पोलिसांनी सभेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.यानंतर देवेंद्र फडणवीस हे सभेसाठी अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. देवाभाऊ जोपर्यंत आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:























