महाराष्ट्रात भाजप किती जागा लढवणार? फडणवीस म्हणाले, काळजी करु नका
देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हेच करु शकतात अशी जनतेला खात्री असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं.
Devendra Fadnavis : देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हेच करु शकतात अशी जनतेला खात्री असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं. देशाची सुत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे. त्यामुळं पुढचे 9 ते 10 महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या आपण किती जागा लढवणार याची चर्चा सुरु आहे. पण तुम्ही काळजी करु नका तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या जागा आपल्या मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
आपल्यात तीन राज्यांचा विजयाचा उत्साह आहे. लोकसभेच्या निवडणुकीचं आव्हान आहे. जनतेन ठरवलं आहे की देशाची सुत्र पुन्हा मोदींच्या हातात द्यायची असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील प्रमुख भाजप पदाधिकााऱ्यांची बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही टीका केली. सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व कसं टिकवायचं याची काळजी विरोधकांना वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी हे ईश्वरानं आपल्याला दिलेलं वरदान
राहुल गांधी हे ईश्वरानं आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. सगळीकडे काँग्रसची अवस्था अशीच आहे. काँग्रेसने केवळ स्वत:चा विचार केला असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे नेते मोठे झाले पक्ष लहान झाल. त्यामुळं सध्या काँग्रेस पक्ष वर येणं कठीण असल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपमध्ये सगळ्यात ताकदवान हा सामान्य कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले.
येणारी निवडणूक भाजपसाठी नाहीतर भारतासाठी लढायची
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपलं एकच काम आहे की, देश पुन्हा मोदीजींच्या हातात द्यायचा आहे. ही निवडणुक भाजपसाठी नाहीतर भारतासाठी लढायची असल्याचे फडणवीस म्हणाले. सध्या इंडिया आघाडीकडून मोदींना हरवण्याची भावना तयार केली जात आहे. त्यांच्यासमोर अजेंडा नाही. ते देशासाठी नाही, गरीबी निर्मुलनासाठी नाही तर परिवार वाचवण्यासाठी पुढे आल्याचे फडणवीस म्हणाले. मोदींना हटवले नाहीतर परिवारवादी पार्टीला कुलपं लागतील यासाठी विरोधक एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली.
विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले. आज आपण पाहत आहोत ते रोज भूमिका बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले.