एक्स्प्लोर

बांधकाम क्षेत्राच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले, निर्णय तात्काळ स्थगित करा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्यात आला होता. पण, तो पुढच्या बैठकीपर्यंत थांबवण्यात आला. केवळ 5 विकासकांच्या प्रस्तावांचा जरी विचार केला तरी त्यांना 2000 कोटी रूपयांचा लाभ मिळणार आहे.

मुंबई : कोरोना प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले करण्याचे काम केले जात असून, त्यातून राज्याचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

या पत्रात ते म्हणतात की, बांधकाम जगताला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील, यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेत एका समितीने काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या. पण, त्यातील काही निवडक आणि सोयीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जात आहे. असे करताना त्याचा परिणाम काय होईल, याचा कुठलाही विचार केला गेला नाही. राज्याच्या तिजोरीला फटका बसून काही निवडक लोकांनाच त्याचा लाभ होईल, अशा पद्धतीने काही लोक काम करत आहेत. मुद्रांक शुल्कातील सवलत, रेडीरेकनर दर आणि प्रीमियम या काही आवश्यक बाबी आहेत. पण, त्याचा केवळ मूठभर लोकांनाच लाभ होणार नाही, हेही सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणण्यात आला होता. पण, तो पुढच्या बैठकीपर्यंत थांबवण्यात आला. केवळ 5 विकासकांच्या प्रस्तावांचा जरी विचार केला तरी त्यांना 2000 कोटी रूपयांचा लाभ मिळणार आहे.

या विकासकांची अनेक अशी प्रकरणे आपल्याकडे असून, ती योग्य प्राधीकरणाकडे आपण सोपवू करू शकतो. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी काही विकासकांची प्रकरणे आणि त्यांना कसा लाभ मिळेल, याची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा हा गुप्त असतो. पण, या निर्णयाचा अजेंडा, संलग्न संपूर्ण कागदपत्र आणि जीआरचा मसुदा हा सर्व विकासकांकडे उपलब्ध आहे. तो सोशल मीडियावर सुद्धा उपलब्ध आहे. त्या आधारावर अनेकांनी आपले हित साधणे सुद्धा सुरू केल्याची वदंता आहे. आज राज्य सरकार दररोज आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करीत असताना राज्याच्या तिजोरीची अशी उघड लूट आपण होऊ देणार नाहीत आणि त्यामुळे तत्काळ त्यावर प्रभावी उपाययोजना कराल, अशी मला खात्री आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकीकडे आपला शेतकरी, बारा-बलुतेदार यांच्यासाठी कोणतेही निर्णय होत नसताना अशा काही मोजक्या खाजगी लोकांना फायदे मिळत असतील, तर ते अतिशय गंभीर आहे. बांधकाम क्षेत्रात मागणी वाढावी, यासाठीच्या सुधारणांविरोधात आपण नाही. पण, त्या नावाखाली सत्तेचा अमर्याद दुरूपयोग होता कामा नये, हेही सुनिश्चित करणे आवश्यक आहे. म्हणूनच हे पत्र आपण मुद्दाम इंग्रजी भाषेत लिहित आहोत. यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तर नाईलाजाने आपल्याला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल. यासंदर्भातील कोणताही तपशील आपण माझ्याकडून केव्हाही प्राप्त करू शकता, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात नमूद केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रमMumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहितीMumbai Boat Accident : नेवीच्या स्पीट बोटने जोरात ठोकलं,बोटीच्या मालकानं धक्कादायक माहितीGate Way of India Boat Accident : चक्कर मारुन टक्कर दिली, बोट अपघाताचा थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget