Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना मानद डाॅक्टरेट; जपानमधील विद्यापिठाची घोषणा
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठाने आज ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी आज घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.
कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आलेत. दरवर्षी जपानमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी होते. महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अॅप्रिसिएशन’ दिले आहे.
कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष रे. सोईडा र्युषो यांनी हे पत्र दिले आहे. त्यात ते म्हणतात, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. भारत-जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
🕧12.40pm JST | 🕘9.10am IST
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
22-8-2023 📍Ren'gejo-in Temple, Koyasan, Wakayama.
An Exquisite Japanese Traditional Luncheon at Wakayama!
Truly humbled by the honour, hospitality, warmth and love at the lunch hosted by Maharashtra’s sister State Wakayama’s Governor, Mr. Shūhei… pic.twitter.com/S8t8YXnkOt
देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर -
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये दाखल होताच टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी फडणवीस यांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलंय. या दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्यात भेटी घेणार आहेत.
जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी माननीय देवेंद्र जी फडणवीस यांना देण्यात आली !
— Hindustani8009🔱🚩 (@SM_8009) August 22, 2023
आता डॉ. देवेंद्र गंगाधर फडणवीस जी 🔥✅😎#DevendraFadnavis pic.twitter.com/v5SFRMJoij
आणखी वाचा :
कांद्याचं गाऱ्हाणं घेऊन कृषीमंत्री दिल्लीत; पण जपानमधून सूत्रं फडणवीसांनी फिरवली