एक्स्प्लोर

Nashik Crime News: वाढदिवशीच दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला, शोधाशोध केली असता भयानक प्रकार उघड; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News: आश्रमशाळेतील दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता.

Nashik Crime News: नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळेतील दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संजय सदू नडगे (वय 17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या मृत्यूमागे आत्महत्या की अन्य काही कारण आहे, याचा शोध आता पोलीस (Police) घेत आहेत. (Nashik Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय नडगे हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी (दि. 12) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास तो कोणालाही काहीही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला. त्यानंतर तो परत न आल्याने शाळा प्रशासनाला संशय आला. बराच शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. अखेर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी शुक्रवारी (दि. 13) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Nashik Crime News : झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

दरम्यान, रविवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास आश्रमशाळेच्या मागील बाजूस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडीत गुरे चारण्यासाठी गेलेल्या काही मुलांना एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती तातडीने आश्रमशाळेत दिली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडके व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा पूर्ण होईपर्यंत सायंकाळ झाली होती. त्यानंतर संजयच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले.

Nashik Crime News : वाढदिवशीच आश्रमशाळेतून गेला निघून

विशेष म्हणजे, संजय नडगे याचा 12 मार्च रोजी वाढदिवस होता. शाळेच्या नोंदीनुसार त्याची जन्मतारीख 12 मार्च 2009 अशी आहे. वाढदिवसाच्या दिवशीच तो आश्रमशाळेतून निघून गेल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संजय नडगे हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात सीमेवर असलेल्या बुरूडपाडा गावातील रहिवासी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजंदारीसाठी स्थलांतर करावे लागत असल्याने संजयला शिक्षणासाठी आश्रमशाळेत ठेवण्यात आले होते. तो काही वर्षांपासून या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी म्हणून राहत होता. त्याचे दोन भाऊदेखील याच शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Crime News: आई-वडीलही घेत होते शोध

दरम्यान, संजय बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई-वडीलही त्याचा शोध घेत होते. आश्रमशाळेच्या मागील डोंगरावरील झाडीत विद्यार्थी अभ्यासासाठी जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. तसेच विद्यार्थी शाळेबाहेर गेला असल्यास त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. या प्रकरणात अशी नोंद ठेवली होती की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे आश्रमशाळेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संजयच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, तो आत्महत्येचा प्रकार आहे की अन्य काही घडले आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून संजयच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची मागणी होत आहे. 

आणखी वाचा 

Solapur Crime News: बाप आहे की शैतान? जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत नको ते कृत्य, मुलगी गरोदर राहिल्यानंतर संतापजनक प्रकार उघड

महत्त्वाच्या बातम्या

Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget