Devendra Fadnavis : मविआच्या कार्यकाळात चांदीवाल अहवाल आला असताना कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. त्यावेळी राज्यात मविआचे सरकार असताना त्यांनी यावर का कारवाई केली नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय.
Devendra Fadnavis On Anil Deshmukh नागपूर : न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी यावर का कारवाई केली नाही? किंबहूना त्यावेळी त्यांनी तो का जाहीर केला नाही? याचे उत्तर महाविकास आघाडीने दिले पाहिजे. मुळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पोलीस आयुक्त महाविकास आघाडीनेच केलं. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे गृहमंत्री असताना स्वतः परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर आरोप लावले.
विरोधी पक्षातील नेत्याच्या सांगण्यावरून एक पोलीस अधिकारी सत्तेतील गृहमंत्र्यांवर आरोप लावेल, असे शक्य आहे का? एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या नोकरीची काळजी असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे कपोल कल्पित आरोपांना कुठलाही अर्थ नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आरोपांचे खंडन करत परत एकदा निशाणा साधला आहे. ते नागपूर विमानतळावर आले असता माध्यमांशी बोलत होते.
त्यांच्या स्तरावर जाऊन उत्तर देणे हे मला महत्त्वाचे वाटत नाही
मुळात अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशच कोर्टाने दिले आहे. हायकोर्टाच्याच आदेशाने केस सीबीआयकडे गेली. त्यावेळी राज्य सरकार हे महाविकास आघाडीचेच होतं. तर दुसरीकडे केंद्र सरकारने देखील यात कुठलाही हस्तक्षेप केला नाही. तसेच त्यावेळी न्यायालयाने दिलेले संदर्भ आपण बघितले तर हे संपूर्ण प्रकरण आपल्या लक्षात येईल. मी मुद्दाम या सर्व प्रकरणावर वारंवार बोलत नाही, कारण रोज जर वारंवार त्याच गोष्टी कोणी करत असेल तर त्यांच्या स्तरावर जाऊन त्याला उत्तर देणे हे मला महत्त्वाचे वाटत नाही. किंबहुना या सर्व प्रकरणातील सत्य आता सर्वांपुढे आले आहे, आणि यापुढे देखील ते सातत्याने येत राहील, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांचे खुले आव्हान
माझ्यावरील 3 वर्षापुर्वी परमविर सिंग आणि सचिन वाझे (Sachin vaze) याने माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी 11 महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्ट पणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पि.ए. ने मला पैसे मागीतले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबडयावर राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आलीय, असा घणाघात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता.
हेही वाचा
Ashok Chavan : मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये; अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबडेकरांवर पलटवार