एक्स्प्लोर

The Family Man 3rd Season: ‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?

प्राईम व्हिडिओ ने सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे . एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे .

The Family Man Season 3: मनोज वाजपेयीची सुपरहिट वेबसिरिज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे . मनोज वाजपेयीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी श्रीकांत तिवारीची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली  (Manoj Bajpayee).या सिरीज चा पहिला सीजन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता तर दुसरा सीजन 2021 मध्ये प्राईम व्हिडिओवर रिलीज झाला .या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला .गेल्या चार वर्षांपासून चाहत्यांना द फॅमिली मॅन च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती आणि आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय . प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे . ' ले लाडले, हो गया श्रीकांत का कमबॅक ' असं लिहीत एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे . 

Family Man Season 3: फॅमिली मॅन सीजन 3 कधी रिलीज होणार ?

पहिल्या दोन सीझनच्या लोकप्रियतेनंतर  द फॅमिली मॅन चा तिसरा सीजन कधी येणार ? हा प्रश्न जवळपास चार वर्षांपासून चाहत्यांना पडला आहे . आणि प्राईम व्हिडिओने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सीजन 3 रिलीज डेटची घोषणा केली आहे . द फॅमिली मॅनचा तिसरा सीजन 21 नोव्हेंबरला प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . ही घोषणा होताच यावर कमेंट सेक्शनमध्ये चाहते तुटून पडले आहेत .चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे . खरंतर कालच प्राईम व्हिडिओने प्रतीक्षा संपली फॅमिली मॅन च्या तिसऱ्या सिझनची घोषणा उद्या (28 ऑक्टोबर ) करू असं सोशल मीडियावर  टाकलं होतं त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली होती .

Prime Video: 'ले लाडले, हो गया श्रीकांत का कमबॅक '

प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये श्रीकांत तिवारीची पत्नी सूची गेल्या चार वर्षात काय काय घडलं हे सांगताना दिसते . 

ती म्हणते, " चार वर्षात किती काय काय झालंय . धृती आता कॉलेजला पोचली आहे . अथर्वने बॅलन्स शिकायला सुरुवात केली आहे . थँक्स गॉड ! काहीतरी चांगलं केलं त्याने . आणि आपले लाडके तिवारी जी ..चार वर्षांपासून एकाच गोष्टीच्या मागे लागले आहेत . " 

त्यावेळी श्रीकांत तिवारी आ sss स्वरात खूप वेळ आवाज काढताना दिसतो . हे नेमकं काय होतंय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे .त्याच्या  आवाजाला कंटाळून  जेके श्रीकांत तिवारीचा तोंडात वडापाव कोंबतो . चार वर्षांपासून तुझं ' आ sss ' सुरू आहे .हे काय आहे आ ss असं जेके विचारतो तेव्हा श्रीकांत तिवारी त्याचा स्टाईलनं उत्तर देतो आ ss रहा हूं भें##....आणि व्हिडिओ संपतो .

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

या व्हिडिओच्या खाली प्राईम व्हिडिओने ले लाडले, हो गया श्रीकांत का कमबॅक असं लिहीत सीजन थ्री च्या प्रदर्शनाची तारीख ही लिहिली आहे .द फॅमिली मॅन चा तिसरा सीजन आता 21 नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओज वर प्रदर्शित होणार आहे .

राज आणि डीके पुन्हा एकदा एकत्र

ही मालिका पुन्हा एकदा राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाली आहे. त्यांच्याच D2R Films या बॅनरखाली या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या सीझनमध्ये मनोज वाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत प्रियामणी, शारिब हाशमी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरी आणि गुल पनाग हे कलाकार झळकणार आहेत.

नवीन चेहरेही झळकणार 

या सीझनमध्ये दोन नवीन कलाकार जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांची एंट्री होत आहे. दोघेही नकारात्मक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. कथा लेखन राज, डीके आणि सुमन कुमार यांनी केलं असून, संवाद लेखन सुमित अरोरा यांचं आहे. तिसऱ्या सीझनचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनीच केलं असून, तुषार सेठ आणि सुमन कुमार यांचाही यात सहभाग आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘द फॅमिली मॅन’चे पहिले दोन सीझन प्रचंड लोकप्रिय ठरले होते. मनोज वाजपेयीने साकारलेला श्रीकांत तिवारी हा पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सीरीजमधील त्याचा ह्यूमर, कौटुंबिक नाती आणि थरार यामुळे हा शो ओटीटीवरील सर्वाधिक आवडत्या मालिकांपैकी एक ठरला.आता ‘द फॅमिली मॅन 3’ लवकरच भारतासह जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget