Pm Modi Visit to pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, अजित पवार करणार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) हे 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
Pm Modi Visit to pune : येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी राजशिष्टाचारानुसार पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. परंतु, फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करणे म्हणजे शिवाजी महाराज यांचा अपमान असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. या विरोधात पुणे राष्ट्रवादीकडून 6 मार्च रोजी आंदोलनही करण्यात येणार आहे.
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मात्र, 25 लोकांच्याच उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेस दाखवणार काळे झेंडे!
दरम्यान, 6 मार्ज रोजीच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान पुणे काँग्रेसकडूनही आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसने कोरोना पसरवला या पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने आधीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आता 6 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने या आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगीही मागितली आहे. काँग्रेसने कोरोना पसरवला या वक्तव्यावर पंतप्रधानांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- PM Modi's visit to Pune : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात महाविकास आघाडीचे नेते करणार 'गो बॅक मोदी', मलिकांवरील कारवाईच्या निषेधार्थ आक्रमक पवित्रा
- Chandrakant Patil : मलिकांनंतर EDची नोटीस मिळालेले संजय राऊत, अजित पवारांचे आता काय होणार?
-
Nawab Malik ED : नवाब मलिकांवर ईडीची कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात झाली? जाणून घ्या
-
Rohit Pawar : नवाब मलिकांनी उघड केलेलं ड्रग्ज रॅकेट कनेक्शन गुजरातपर्यंत; त्यामुळेच कारवाई , रोहित पवारांचा हल्लाबोल