एक्स्प्लोर

जनावरांचं टॅगींग पूर्ण करा, अन्यथा खरेदी विक्रीस मनाई, अहमदनगरमध्ये 18 लाख टॅगिंग पूर्ण

जनावरांना (Animal)  कानातील टॅग (Tagging) लावणे बंधनकारक केले आहे. 1 जूनपासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे.

Animals Ear Tagging News : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) जनावरांना (Animal)  कानातील टॅग (Tagging) लावणे बंधनकारक केले आहे. 1 जूनपासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय 18 लाख 876 जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

आपत्ती काळात जनावर दगवल्यास अनुदान मिळवण्यासाठी हा टॅग आवश्यक 

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कान टॅगिंग रेकॉर्ड करते. त्यामुळं जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय आपत्ती काळात जनावर दगवल्यास अनुदान मिळवण्यासाठी हा टॅग आवश्यक असणार आहे. जनावरांचे टॅगिंग नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करुन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

इअर टॅगिंग केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करुन घेण्यास मदत

दरम्यान, मिळालेल्आ माहितीनुसार, केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत NDLM-नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुपालकांकडील सर्व पशुधनास इअर टॅगिंग (कानातील पिवळा बिल्ला) केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करुन घेण्यास मदत होणार आहे. त्यामळं लवकरता लवकर पुशपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगींग पूर्ण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

पशुसंवर्धन विभागानं केलं आवाहन

जनावरांचे एअर टॅगींग केल्यामुळं सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सर्व पशुधनास कानात टॅग लावुन त्याची भारत पशुधन प्रणलीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे कानात बिल्ले मारुन घेण्यासाठी त्वरित आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळं आता पशुसंवर्धन विभागाच्या आवाहनानंतर किती पशुपालक आपल्या जनावरांच्या कानाला टॅगींग करुन घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Latur News: लातूरमध्ये चारा टंचाईच्या झळा... चारा महागला, जनावरे विक्रीसाठी बाजारात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?Walmik Karad Kej Hospital : खांद्यावर गमछा, कॅमेरासमोर जोडले हात; वाल्मिक कराड केज रुग्णालयातAshok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
Embed widget