एक्स्प्लोर

दीपक केसरकरांनी अनेकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं, शिवसेना नगराध्यक्षांचा आरोप

गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राडा झाला नाही. ही जादू मी केली. ही जादू असेल ती मी पाच वर्षात जादू करुन दाखवली

सिंधुदुर्ग : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर शिवसेनेचेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घणाघाती आरोप केले आहेत. दीपक केसरकर हे जादूगार आहेत. करणी करुन त्यांनी नारायण राणेंचा पक्ष प्रवेश अडकवला आहे. त्यांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं, असा आरोप बबन साळगावकर यांनी केला. शिवसेनेतूनच झालेल्या या आरोपाने सावंतवाडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ माजली आहे. 'यापुढे बबन साळगावकर माझे राजकीय वारसदार नसतील' मात्र दीपक केसरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. साळगावकर यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्न पडत असल्याने हे आरोप करत असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. आतापर्यंत मी बबन साळगावकर यांना माझा राजकीय वारस म्हणत होतो. मात्र अशा आरोपांमुळे यापुढे माझे ते राजकीय वारसदार नसतील, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं. तसंच बबन साळगावकर यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे, त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही, असंही केसरकर यांनी सांगितलं. कामांच्या गमछ्या मारु का? : दीपक केसरकर "भाजपसोबत शिवसेनेची युती आहे. गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राडा झाला नाही. ही जादू मी केली. ही जादू असेल ती मी पाच वर्षात जादू करुन दाखवली. केलेल्या कामांच्या गमछ्या मारत बसू का," असा टोला दीपक केसरकर यांनी बबन साळगावकर यांना लगावला. ....तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश नाही शिवसेनेचा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ठाम विरोध आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश होणार नाही, अशा शब्दात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ठणकावलं. ते सिंधुदुर्गात बोलत होते.  नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबद्दल स्वत:च तारीख जाहीर केली आहे. शिवसेनेला विचारात घेऊनच राणेंना प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Embed widget