एक्स्प्लोर

Maharashtra winter : राज्यात हुडहुडी वाढली ; सातारच्या वेण्णालेकमध्ये निचांकी तापमानाची नोंद, काही ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यात थंडी वाढलीय. साताऱ्यातील वेण्णालेकमध्ये 4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वात निचांकी तापमान आहे. वेण्णालेक खालोखाल महाबळेश्वरचे तापमान 7 अंश सेल्सिअसवर घसरले आहे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यातील वेण्णालेकमध्ये 4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वात निचांकी तापमान आहे. वेण्णालेक खालोखाल महाबळेश्वरचे तापमान 7 अंश सेल्सिअसवर घसरले आहे.  

महाबळेश्वर पाठोपाठ वाईच्या किमान तापमानातही घट झाली आहे. संपूर्ण वाईसह कृष्णा नदीवर धुक्याची चादर पसरली आहे. नंदूरबार जिल्ह्यात 7अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगांमधील डाब परिसरात दवबिंदू गोठले आहेत.  
 
धुळे जिल्ह्यातही किमान तापमानात घट झाली आहे. धुळ्याचे तापमाण 7.2 अंश सेल्सिअस झाले आहे. तसेच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक येथे 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  तर जळगावात 9 अंश किमान तापमान नोंदविले गेले. काल दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत होता. 

दरम्यान, वातावरणात गारठा कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम होणार असून पुढील 2 दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

लातुरात पावसाची हजेरी

एकीकडे थंडी वाढली असतानाच आज पहाटे लातूर शहर आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. 20 ते 25 मिनिटे शहरात चांगला पाऊस झाला.  

नागरपुरात पाऊस
नागपूर शहरात आज सकाळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि धुकं असताना शहरात साडे आठ वाजता मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने आधीच पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Parinay Fuke On Rohit Pawar : राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nagpur Crime News: दारूच्या नशेत 45 वर्षीय पित्याकडून पोटच्या लेकीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न? संतापात 17 वर्षीय मुलीने डोक्यात बॅट टाकली, पित्याचा जागीच मृत्यू; नागपूर हादरलं!
दारूच्या नशेत 45 वर्षीय पित्याकडून पोटच्या लेकीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न? संतापात 17 वर्षीय मुलीने डोक्यात बॅट टाकली, पित्याचा जागीच मृत्यू; नागपूर हादरलं!

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Embed widget