एक्स्प्लोर

फडणवीस म्हणाले, मानधन वाढवलंय, आशा सेविका म्हणाल्या अजून मिळालं नाही, उपमुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी निर्णय जाहीर केला!

Nagpur News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध रंगल्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच एका मंचावर आले आहेत.

Nagpur News नागपूर : नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील झिल्पा, भोरगड आणि घाटपेंढरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वर्चुअल (ऑनलाईन) लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. आजच्या या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  आणि सध्याचे विद्यमान  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रामुख्याने उपस्थित आहेत. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी झिल्पा आणि भोरगड या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील आहेत. त्यामुळे ते नागपुरातील सुरेश भट सभागृहामध्ये अनिल देशमुख हेही उपस्थित झाले आहेत. मात्र, गेल्या काही दिवासांपासून दोन्ही आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये मोठे शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच हे दोन्ही नेते आमोरासमोर आले आहेत.

अशातच, या कार्यक्रमात आज आशा सेविकांना 1900 पेक्षा जास्त अँड्रॉइड मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा सेविकांना मोबाईलसाठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याची घोषणा केली. तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यातील अशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ केल्याचे भाष्य केलं. मात्र, समोर उपस्थित असलेल्या अशा सेविकांनी उपमुख्यमंत्र्यांनाच थेट उलट सवाल करत या घोषणेचा लाभ आपल्या या महिन्यापासून पदरात पडून घेतलाय. 

नेमकं काय म्हणले उपमुख्यमंत्री?  

मला आज हे सांगताना या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की, की गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक निर्णय घेतला, ज्यामध्ये राज्यातील अशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ केली. या निर्णयानुसार अशा सेविकांच्या मानधनामध्ये आपण भरघोस अशी वाढ केली. गेल्या कित्येक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी ही आशा सेविकांची होती. असे बोलत असतानाच  मंचासमोर उपस्थित असलेल्या आशा सेविकांनी मानधन अद्याप पर्यंत मिळाली नसल्याच्या घोषणा दिल्या.

त्यावर तात्काळ उलट टपाली प्रश्न करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत तुम्हाला वाढीव मानधन मिळाले नाही का? तर या संबंधित जीआर निघाला असून आता या महिन्यापासून तुम्हाला वाढीव मानधन मिळेल असे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यासोबतच तुमच्यासाठी आम्ही आणखी एक चांगला निर्णय घेतला आहे. तो म्हणजे दहा लाखांपर्यंतचा इन्शुरन्स हा आम्ही अशा सेविकांसाठी घेतल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

आशा सेविकांना 1900हून अधिक मोबाईलचे वितरण 

आजच्या कार्यक्रमात आशा सेविकांना 1900 हून अधिक मोबाईल वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आणखी एक घोषणा करत मोबाईल साठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याचे सांगितले. खनिज विकास निधीमधून वर्षाला लागणारा रिचार्जचा खर्च केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Embed widget