एक्स्प्लोर

मराठवाड्यातील धरणे भरणार! नाशिक-नगरच्या धरणांमधून मोठा विसर्ग सुरु, जायकवाडीत येणार पाणी; विसर्ग ,पाणीसाठा किती?

मराठवाड्यातील धरणांना मागील कित्येक दिवस पाण्याची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने धरणसाठ्यात वाढ होत आहे. नाशिक आणि नगरच्या धरणांमधून विसर्ग सुरु असल्याने जायकवाडी धरणात पाणी येणार..

Dam Water Storage: राज्यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दमदार पावसाची हजेरी लागली आहे. अनेक ठिकाणी  पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. आज राज्यातील एकूण धरणे 62.89% भरली आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यांमधून आज सकाळपासून विसर्ग सुरू आहे. परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येणार आहे. सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91 टक्क्यांवर आहे. 

पावसाला जवळजवळ दोन महिने होत आले असले तरी मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र होतं. मागील काही दिवसात झालेल्या पावसाने धरणांच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितलं. नाशिकच्या पाच धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीतील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे. 

जायकवाडी धरणात किती पाणीसाठा आहे? 

मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमतेचे असणारे जायकवाडी धरण मागील काही दिवसात केवळ चार ते पाच टक्क्यांवर होते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने हा साठा आता वाढला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज जायकवाडी धरण 10.35 टक्क्यांनी भरले आहे. मराठवाड्यातील इतर धरणांमध्ये पाणीसाठ्यात  हळूहळू वाढ होतानाचे चित्र आहे. या धरणसाठ्यात हळूहळू वाढ हाेत असली तरी सिंचनासह, शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे. मराठवाडा  विभागात 11 मोठे, 75 मध्यम तर 749 लघु प्रकल्प आहेत. गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवर 42 बंधारे आहेत. एकूण 877 प्रकल्पांमध्ये अवघा 20  टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे.उत्यामुळं लघु आणि  मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गोदावरी नदीपात्रात होतोय विसर्ग 

नाशिक विभागातील धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असून गोदावरी नदीपात्रात पाणी वाढत आहे. दारणा धरणातून 22,966 क्युसेकने विसर्ग सुरू असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 36 हजार 731 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग सुरूय. सध्या नदीतील पाणी पातळी ही 468.49 मी. इतकी आहे. यासह नेवासा शेंदूरवादा या भागातूनही गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे.

नाशिक विभागाच्या कोणत्या धरण-बंधाऱ्यांमधून होतोय विसर्ग?

१. दारणा धरण २२९६६ क्यूसेक
२. नांदूर मधमेश्वर बंधारा ३६७३१ क्सूसेक
३. नाशिक शहर होळकर पूल ४८८१ क्यूसेक
४. भंडारदरा धरण (नगर) २७११४ क्यूसेक
५. कडवा धरण ११२९७ क्यूसेक
६. भाम धरण ६४७० क्युसेक
७. ठेंगोडा बंधारा ६९६३ क्युसेक
८.पालखेड ५५७० क्युसेक
९. चणकापूर धरण २२३१ क्युसेक
१० निळवंडे धरण १३७५५ क्युसेक
११. आढळा धरण १४३९ क्युसेक

हेही वाचा:

शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये, कोणत्या विभागात किती मिळणार मदत? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Embed widget