एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये, कोणत्या विभागात किती मिळणार मदत? 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, कोणत्या विभागात किती मदत मिळाली याबाबतची माहिती पाहुयात.

Agriculture News : अवकाळी पावसामुळं (unseasonal rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान (Heavy loss of crops) झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, कोणत्या विभागात किती नुकसान झालं आहे? आणि किती मदत मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेत

विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेत आहे. कधी आस्मानी संकट येतं. तर कधी सुलतानी संकट येत. कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परिणामी हाती आलेली पिकं वाया जातात. यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कोणत्या विभागात किती आर्थिक मदत ?

सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागात 37 हजार 422 हेक्टरवरीला पिकांना फटका बसला होता. 73 हजार 567 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारनं 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. तर नागपूर विभागात 3 लाख 54  हजार 756  शेतखऱ्यांच्या  2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यासाठी सरकारनं 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर पुणे विभागात 2 हजार 297 शेतकऱ्यांचे 1 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना 5 कोटी 83 लाखांची मदत जाहीर झालीय. दरम्यान, नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 

नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये 

दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये असे निर्देश देखील राज्य सरकारनं दिले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Heavy Rain : अवघ्या काही तासांच्या पावसाचा सर्वत्र हाहाकार! हजारो शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका, बळीराजा पुन्हा हवालदिल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget