Osmanabad : उस्मानाबादमध्ये प्रथमच सायकलोथॉन; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही भरभरुन प्रतिसाद
Osmanabad Cycling Competition : उस्मानाबाद येथे सायकलोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही सहभागी झाले होते.
Osmanabad Cycling Competition : उस्मानाबाद (Osmanabad) येथे मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती आणि फ्युचर सायकल अँड स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलोथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरु झाली. एबीपी माझा या स्पर्धेचा मीडिया पार्टनर आहे. उस्मानाबाद येथे प्रथमच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही सहभागी झाले होते. सायकलिंगची स्पर्धा 25,50 आणि 100 किलोमीटर या गटात संपन्न झाली.
या स्पर्धेसाठी ठराविक अंतर 'असे' होते
25 किलोमीटरसाठी उस्मानाबाद वरुडा रोड ते पवारवाडी असे अंतर होते. तर, 50 किलोमीटरसाठी उस्मानाबाद ते तुळजापूर अंतर होते. 100 किमी साठी उस्मानाबाद ते तामलवाडी या मार्गावर सर्व सायकलस्वारांनी सायकलिंग केली.
यावेळी, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, मकरंद राजे निंबाळकर हे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. शरीरिक स्वास्थ्य चांगले राहावे, तसेच स्वास्थ्याचे महत्व पटवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन , उस्मानाबाद स्पोर्ट अकॅडमी, फिटनेस ग्रुप उस्मानाबाद सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
इतकेच नाही, तर या स्पर्धेसाठी पुणे, मुंबई लातूर, बार्शी ,सोलापूर, अहमदनगर या ठिकाणाहून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
या सायकलिंग स्पर्धेमध्ये जे विजेते झाले त्यांची नावे खालीलप्रमाणे :
25 किलोमीटरचे विजेते :
1. नरेंद्र सोमवंशी लातूर 50 मिनिटे 16 सेकंद
2. हर्षवर्धन गणेश जमाले, उस्मानाबाद 1 तास 2 मिनिटे आणि 31 सेकंद
3. राज रविकांत शितोळे, उस्मानाबाद 1 तास 5 मिनिटे आणि 14 सेकंद
50 किलोमीटरचे विजेते :
1. ओंकार सरदार अंगरे 1 तास 33 मिनिटे आणि 15 सेकंद
2. श्रावण उगीले 1 तास 42 मिनिटे आणि 26 सेकंद
3. प्रवीण खानवले 1 तास 44 मिनिटे आणि 50 सेकंद
100 किलोमीटरचे विजेते :
1. सिद्धेश अजित पाटील, पुणे 2 तास 46 मिनिटे आणि 1 सेकंद
2. हनुमान यशवंतराव चोपे पुणे 3 तास 15 मिनिटे आणि 42 सेकंद
3. गणेश काकडे लातूर, 3 तास 23 मिनिटे आणि 14 सेकंद
तर, वरील सर्व गटातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना सायकल बक्षीस दिले. तर, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना स्मार्ट वॉच देण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. खासदार ओमराजे निंबाळकर, मकरंदराजे निंबाळकर यांच्याहस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
- एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं; दानवेंची खरमरीत टीका
- Shivsena : शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून एमआयएमला सुपारी; राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
- CM Uddhav Thackeray : हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha