एक्स्प्लोर
Advertisement
नांदेडमध्ये 16 लाख, तर पाथर्डीत 95 लाखांची रक्कम जप्त
नांदेड : नांदेड शहरात एका कारमध्ये 16 लाखांची रक्कम सापडली आहे. नांदेडच्या व्हीआयपी रस्त्यावर तपासणीवेळी ही रक्कम सापडली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी मोठी रक्कम जप्त करण्यात येत आहे.
नांदेडमध्ये कारमध्ये सापडलेल्या 16 लाख रुपयांमध्ये सर्व नोटा 500 आणि हजारच्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने ही रक्कम ताब्यात घेतली आहे. तसंच आयकर विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.
अहमदनगरमध्ये 95 लाखांची रक्कम सापडली
अहमदनगरच्या पाथर्डीत 95 लाखांची रक्कम एका खासगी वाहनात सापडली आहे. ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रची असल्याची प्राथमिक माहिती आहे. चिंचपूर पांगूळ या शाखेतून पाथर्डीला ही रक्कम नेण्यात येत होती, असंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान पाथर्डी शहराच्या चेक पोस्टवर आढळलेली रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र पोलिसांचं पडताळणी करण्याचं काम सुरु आहे. पाथर्डीत नगरपालिकेची निवडणूक सुरु असल्याने प्रशासनाकडून विशेष लक्ष दिलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement