(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय, दोन दिवसात चारपटीने वाढले रुग्ण
Mumbai Corona Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
Mumbai Corona Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 1201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 30 जून 2022 नंतर मुंबईत आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पाच हजार 712 सक्रीय रुग्ण झाले आहे. मुंबईत मागील 24 तासांत 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच आज दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. दरम्यान, 30 जून रोजी मुंबईत एक हजार 265 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 1201 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 11,35,680 इतकी झाली आहे. तर मृताची संख्या 19,670 इतकी झाली आहे. याआधी बुधवारी मुंबईत 975 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता.
दोन दिवसात चारपटीने वाढले रुग्ण -
दोन दिवसांत मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. मंगळवारी मुंबईत 332 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर बुधवारी मुंबईत 975 रुग्ण आढळले होते. आत मुंबईत 1201 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 97.8 टक्के इतका आहे. मुंबईत आढळलेल्या नव्या 1201 रुग्णांमध्ये 1145 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 949 दिवसांवर गेला आहे.
COVID19 | Mumbai reports 1,201 new cases today; Active cases 5,712 pic.twitter.com/YFIwf7HHlS
— ANI (@ANI) August 18, 2022
राज्यातील स्थिती काय?
राज्यात आज 2246 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1920 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,18, 535 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.