एक्स्प्लोर

अनैतिक संबंधातून दोघांनी केला खून, कापूस वेचणाऱ्या 'त्या' महिलेच्या खून प्रकरणाला वेगळे वळण

24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केल्याच्या घटनेने पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींना ताब्यात घेतले.

बीड : शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये आढळून आला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सालेगाव मधील या घटनेने खळबळ उडाली होती. 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केल्याच्या घटनेने पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींना ताब्यात घेतले. सदर खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचे आता पुढे आले आहे.

एका 24 वर्षीय विवाहित महिलेचा शेतात कापूस वेचताना कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता महिलेचा मोबाईल त्यांना आढळून आला. त्या आधारे त्यांनी तपासणी केली असता त्यांना पंकज भगवान जाधव याच्याशी पहाटे संपर्क झाल्याचे निदर्शनास आले.

त्या आधारे अधिक तपास केला असता सदर महिला हे शेतात गेली असता तिच्याशी पंकज भगवान जाधव याने शारीरिक संबंध ठेवले. त्या नंतर त्याने त्याचा मित्र धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यास फोन करून बोलावून घेतले. त्यानेही ही सदर मयत महिलेशी शरीर सुखाची मागणी केली; मात्र त्या महिलेने नकार दिला आणि तिने हा प्रकार तिच्या पतीस सांगते व पोलिसात तक्रार देते; अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी तिच्या हातातील मोबाईल हातावर मारून हिसकावून घेतला. नंतर धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यांनीही तिला ओढत नेऊन कापसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला.

त्या नंतर हा प्रकार घरी माहित होईल किंवा पोलिसात तक्रार होईल; म्हणून दोघांनी मिळून त्या महिलेचा स्कार्फने गळा आवळून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्या नंतर दोघांनी प्रेत उचलून सुमारे पन्नास फूट अंतरावर कापसाच्या पिकात नेऊन टाकले.

या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये कुणाचा गुन्हा दाखल केला मात्र प्रथम दर्शनी या महिलेसोबत विनयभंग आणि बलात्कार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर नातेवाईकांनी मात्र जोपर्यंत बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्या महिलेचे प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जवळच्या नातेवाईकाकडूनच या महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे आता पुढे आले आहे.

संबंधित बातम्या :

इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणं महागात! अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्याला सहा महिन्यानंतर बेड्या

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

Embed widget