एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

धुळे जिल्ह्यात कापसाला 6600 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी दर

यंदा कापसाचं उत्पादन कमी आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्रीत लिलाव पद्धतीने खरेदी झालेल्या कापसाला 6600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

धुळे : ‘दात आहेत, तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही’ अशी परिस्थिती सध्या राज्यात झाली आहे. कमी पाऊस, बोंड अळीचा प्रादुर्भाव, त्यात दुष्काळाचं सावट यामुळे कापसाच्या उत्पादनात यंदा घट आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी अधिक, पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने यंदा कापसाला अर्थात पांढऱ्या सोन्याला सोन्याचा भाव आलाय. धुळे जिल्ह्यातील साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दुपारी लिलाव पद्धतीने खरेदी झालेल्या कापसाला 6600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला, जो राज्यातील आतापर्यंतचा सर्वोच्च भाव असल्याचा दावा साक्री बाजार समितीच्या सभापतींनी केलाय. साक्रीच्या बाजार समितीत पहिल्याच दिवशी किमान 300 टन कापसाची आवक अवघ्या दोनच तासात झाली होती. शेजारच्या मध्यप्रदेशात कापसाला 6100 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला आहे. महाराष्ट्रात कापसाला आतापर्यंत 5600 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचाच भाव मिळाला आहे. मात्र साक्री बाजार समितीत कापसाला मिळालेला 6600 रुपयांचा दर हा सर्वाधिक असल्याचं बाजार समितीचं म्हणणं आहे. पांढऱ्या सोन्याच्या भावाची चकाकी ऐन सणासुदीच्या काळात चकाकल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. दरम्यान, पावसामुळे यंदा कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. अनेक शेतकऱ्यांचा तर खर्च निघणंही कठिण आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी अधिक असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे ‘दात आहेत, तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Embed widget