#Coronavirus राज्यात 2287 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1225 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज
महाराष्ट्रात तब्बल 2287 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत, त्यामुळे राज्यात सध्या 38493 अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात आज 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, आज कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्राल आणखी एका संकटाने वेढलं आहे ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळ, हे वादळ उद्या मुंबईसह कोकण किनारपट्टीला धडकणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय, त्यामुळे बीकेसीतील कोविड रुग्णालयातील रुग्णांना हलवण्यात आलं आहे.
Coronavirus | नांदेडहून पंढरपूरात आलेल्या 16 वारकऱ्यांना क्वारन्टाईन केलं जाणार
कोरोना चाचणीच्या आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 72 हजार 30 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 453 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 097 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 103 कोरोनाबाधित रुग्णांच्या आज मृत्यू झालाय.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू
ठाणे जिल्हा - 74 (मुंबई 49, ठाणे शहर 1, नवी मुंबई 4, पनवेल 4, रायगड 6, मीरा भाईंदर- 10),
नाशिक - 2 ( नाशिक 1, अहमदनगर 1)
पुणे - 21 (पुणे 10, सोलापूर 5, सातारा 6)
कोल्हापूर- 3 (सांगली 3, अकोला ३)
Coronavirus | जळगावात कोरोना विषाणूचं थैमान, 24 तासात 13 जणांचा मृत्यू
आज नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये 68पुरुष तर 35 महिलांचा समावेश आहे. या 103 मृत रुग्णांमध्ये 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत, तर 39 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर पाच जण 40 वर्षांखालील आहेत. या रुग्णांपैकी ६९ रुग्णांच्या अहवालात 67% मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळलेत. त्यामुळे कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2465 झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचं जाळं जितक्या वेगाने पसरतंय त्याच वेगाने आता हळूहळू रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही काहीसं वाढताना दिसतंय. देशभरात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे राज्य सरकार राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने अनलॉकची घोषणा करत हॉटेल्स आणि लसूनला परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्यात केवळ नॉन कंटेन्मेंट झोनमध्येच यासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातही हळूहळू काही उद्योग अनलॉक होत आहेत मात्र नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील ही अपेक्षा आहे.
Cyclone Nisarga | चक्रीवादळाचा बीकेसीतल्या कोविड सेंटरला धोका; रुग्णांना इतर सेंटरला हलवायला सुरुवात
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )