(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना, डायलिसिससाठी 24 तासांचा बैलगाडीवर प्रवास
रोहिदास हे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या पळसगावचे रहिवाशी आहेत. त्यांचे गाव नांदेडपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर आहे. लॉकडाऊन असल्याने नांदेडला डायलिसिससाठी कसे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने आणि मग केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. देशवासियांना जगावण्यासाठीची ही धडपड सुरू आहे. पण याच लॉकडाऊनमुळे अन्य आजारी रुग्णांचा जीव जातो की काय अशी स्थिती आहे. कोरोनाशिवाय देखील अन्य असे अनेक आजार आहेत त्यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो हे कदाचित सरकार विसरत आहे. रोहिदास भीमराव पवळे वय 30 वर्ष शरीराने अपंग आहेत. रोहिदास यांच्या किडन्या खराब झाल्या आहेत. जगण्यासाठी त्यांना डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळेस डायलिसिस आवश्यक आहे.
रोहिदास हे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या पळसगावचे रहिवाशी आहेत. त्यांचे गाव नांदेडपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर आहे. लॉकडाऊन असल्याने नांदेडला डायलिसिससाठी कसे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला. तालुक्याच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधला पण रूग्णालय मिळणार नाही असे उत्तर मिळाले. रोहिदास यांना जगायचं आहे. कुटुंबाला देखील रोहिदास यांना जगवायचंय. अखेर शेतकरी असलेल्या कुटुंबाने काहीही झाले तरी नांदेड गाठायचे ठरवले. शेतातील बैलगाडीला बैल जुंपले. सोबतीला रोहिदासची आई आणि भाऊ निघाले. घरून जेवणाचा डब्बा घेऊन मध्यरात्री 2 वाजता बैलगाडीने प्रवास सुरु केला. सकाळ झाल्यावर एका झाडाखाली थांबून जेवण केले अन पुन्हा पुढील प्रवास सुरु झाला. तब्बल साडेबारा तासांनी रोहिदास डायलिसिसच्या रुग्णालयात पोहोचले.
रोहिदासच्या परिवरकडे जबरदस्त जिद्द होती म्हणून ते बैलगाडीतून एवढा प्रवास करू शकले. पण एवढ्यावर सगळं संपणार नाही. रोहिदासला आठवड्यातून दोन वेळेस हा प्रपंच करावा लागणार आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रामीण भागात आरोग्य सुविधा निर्माण केल्याचं दावा आजवर अनेकदा केला आहे. मग हा दावा खरा आहे तर रोहिदास सारख्या अपंग रुग्णाला 80 किलोमीटरचा बैलगाडी प्रवास का करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनेतून आजवर शेकडो रूग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था रुग्णालये यांनी देखील रूग्णवाहिकेच्या नावाखाली करमाफी मिळवली. मग यातील एकही रूग्णवाहिका रोहिदास सारख्या रुग्णाला का मिळू शकत नाही आहे. कोरोना हा आता आलेला विषाणू पण आपल्या देशात डेंग्यूसारख्या रोगाने रस्ते अपघातात तर ग्रामीण भागात साप चावून देखील हजारो लोक मारतात. लॉकडाऊन करणे हे आवश्यकच होते पण ते करतांना अन्य आजारांची काळजी सरकारने घेतली नाही हे यातून स्पष्ट होतं आहे.
Coronavirus | ऊसतोड कामगारांसाठी 100 कोटांची तरतूद करा : सुरेश धस जग महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या देशात ग्रामीण भारतातील चित्र खूप वाईट आहे हे मान्यच करावे लागेल. रोहिदास हा एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बघितले तर सरकारची आरोग्य यंत्रणा आणि दावे हे किती पोकळ आहेत. हे सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. त्यामुळेच यापुढे सरकारने मतांची बेरीज करण्यासाठी स्मारकांची घोषणा सोडून ग्रामीण भारतात प्रामाणिक आरोग्य सेवा निर्माण करावी एवढीच अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी रामदास आठवलेंकडून मदत, गरजूंच्या जेवणाचीही सोय Coronavirus | परप्रांतीय कुटुंबाची महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता, किराणा दुकान गरिबांसाठी विनामूल्य खुलं