एक्स्प्लोर
coronavirus LIVE UPDATES | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना पत्र, तीन निर्णय तातडीने घेण्याची मागणी
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यातील शासनमान्य कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची यादी
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 120 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 868 वर पोहोचली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तात्काळ तपासणी करुन घ्या अस शासनाकडून सांगितलं जातंय. मात्र ही तपासणी कुठे करायची हेच अनेकांनी माहित नाही. राज्यात कोविड 19 ची तपासणी कुठे कुठे होते याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे.
जिल्हानिहाय आणि संस्थानिहाय कोव्हिड-19 तपासणी केंद्रांची यादी
- मुंबई महानगर महापालिका - कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई
- ठाणे जिल्हा, रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
- पालघर जिल्हा, उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका - हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
- सातारा जिल्हा - बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
- पुणे जिल्हा - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
- अहमदनगर जिल्हा आणि नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
- कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, सांगली
- सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याकरिता - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
- धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) - श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
- औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्याकरिता - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
- अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याकरिता - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
- नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
21:15 PM (IST) • 07 Apr 2020
भाजपा आमदार आशिष शेलार यांचे वडील बाबाजी शेलार यांचं 85 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन, गेल्या काही महिन्यांपासून बाबाजी शेलार हे आजारी होते. आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
19:05 PM (IST) • 07 Apr 2020
बारामतीत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, कोरोनाचे संक्रमण झालेल्या भाजी विक्रेत्याच्या 12 नातेवाईकांपैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, घराबाहेर न पडण्याचे बारामतीच्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचं नागरिकांना आवाहन
17:57 PM (IST) • 07 Apr 2020
लोकांना अन्नधान्य मिळत नाही, एनजीओकडून सरकार मदत मागत आहे, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची सरकारवर टीका, पालकमंत्री आदित्य ठाकरे फोन उचलत नसल्याचाही आरोप, तबलिगी समाजबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची अबू आझमींनी भेट घेतली
17:53 PM (IST) • 07 Apr 2020
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी धारावी पोलीस स्थानकात जाऊन कोरोनाबाबत आढावा घेतला
16:30 PM (IST) • 07 Apr 2020
पुण्यात करोनाबाधित असलेल्या तिघाजणांचा मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. तिघांचेही वय हे 60 वर्षापुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि परिवाराची, आप्तांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
Load More
Tags :
Marathi News Today ABP Majha Latest Update Corona Hoyspot Corona In Ahamadnagar Corona In Mumbai Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Coronavirus Updates Corona Updates Corona In Maharashtra Maharashtra Corona Coronavirus Corona News Covid 19मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement