Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीतील मंगल कार्यालयातील लग्नाचे बुकिंग रद्द
जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे.
परभणी : कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून अनेक गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यात मंगल कार्यालय, लॉन्सचा सहभाग आहे. उद्या लग्नाचे अनेक मुहूर्त असल्याने बुक करण्यात आलेल्या सर्व बुकिंग कार्यालयांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 50 पेक्षा जास्त लग्न रद्द झाली आहेत.
परभणी शहरात छोटी-मोठी मिळून 25 तर उर्वरित जिल्ह्यात 35 अशी एकूण 65 मंगल कार्यालय, लॉन्स आणि सभागृह आहेत. या वर्षातील लग्नाचा सर्वात मोठा मुहुर्त उद्या आहे. त्यामुळे65पैकी 50 ते 55 मंगल कार्यालयांची बुकींग झाली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंगल कार्यालयम 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी अनेक जोडप्यांनी घरीच छोटेखानी लग्न उरकून घेण्यात धन्यता मानली आहे. तर काहींनी पुढच्या महिन्यातील तारखेच्या बुकिंग केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : कोरोना व्हायरसचे सँपल तपासण्यासाठी राज्यात नव्या लॅब उभारणार : राजेश टोपे
कोरोनामुळे मंगल कार्यालयांनी घेतलेल्या निर्णयामुळे उद्योग, व्यवसाय, रेल्वे, बसला मोठा फटका बसत असतानाच आता मंगल कार्यालय आणि लग्नासारख्या मोठ्या समारंभावर अवलंबून असणाऱ्या केटरिंग आणि इतर व्यावसायिंकांनाही फटका बसत आहे.
दरम्यान, जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. आज पुण्यामध्ये आणखी एका महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्णांसोबत दुजाभाव करु नका : राजेश टोपे
Coronavirus | मुंबईतल्या डॉक्टरांच्या टीमचा अनोखा उपक्रम, कोरोनाबाबत फोनवरुन मोफत सल्ला
Coronavirus | कोरोनोमुळे मध्य रेल्वेच्या 23 तर पश्चिम रेल्वेच्या 10 गाड्या रद्द