Break the Chain: मंत्रालय आणि सरकारी कार्यालयात पूर्णवेळ मास्क लावणे बंधनकारक
Break the Chain: महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असताना दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.
Break the Chain: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा प्रार्दुभाव (Coronavirus) वाढू लागल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि अर्थचक्रास चालना देण्यासाठी राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. दरम्यान, सोशल डिस्टंसिन्ग आणि मास्क लावणे बंधनकारक असताना काही लोक निष्काळजीपणाने वागत असल्याचे निर्दशनास आले. ज्यामुळे राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. याचपार्श्वभूमीवर कोरोनाच्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी आता सक्षम प्राधिकारी, राज्य व्यवस्थापन समिती यांना मिळालेल्या अधिकारानुसार आदेश पारित करण्यात येत आहे.
राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, 1897 व आपत्ती निवारण कायदा, 2005 ची अंबलबजावणी सुरु आहे. याअंतर्गत मंत्रालय आणि सर्व शासकीय आस्थापनांमध्ये पूर्णवेळ मास्कचा लावणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील मंत्रालय व खाजगी कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाक- तोंड पूर्णत: झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच राज्यातील मंत्रालय व खाजगी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लशींच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. याची खात्री संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी, असेही आदेश देण्यात आले.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 201 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 31 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 लाख 5 हजार 51 इतकी झाली आहे. तर, मृतांच्या संख्येने 1 लाख 40 हजार 60 आकडा गाठला आहे. राज्यात आज एकूण 22 हजार 981 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांचा एकूण आकडा 64 लाख 38 हजार 395 वर पोहचला आहे. राज्यात सध्या 22 हजार 981 रुग्ण सक्रीय आहेत.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याचा तज्ज्ञांकडून मत व्यक्त करण्यात आले. राज्यात आज (मंगळवार, 26 ऑक्टोबर) 5 लाख 28 हजार 853 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे. राज्यातील लसीकरणाने 9 कोटी 58 लाख 8 हजार 623 जणांना कोरोना प्रतिबंध देण्यात आली आहे. यात कोरोना लशींच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.
संबंधित बातम्या-
- झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस लवकरच देशभरातील बालकांना देण्यात येणार: केंद्रीय आरोग्यमंत्री
- Coronavirus In Karnataka: कर्नाटकासमोर नवे संकट, कोविडच्या 'ए व्हाय 4.2' प्रकाराचे 7 रुग्ण आढळल्याने राज्यात खळबळ