एक्स्प्लोर
सोलापुरातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर; तीन दिवसात तब्बल 1027 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 28 रुग्णांचा मृत्यू
ग्रामीण भागात आज (सोमवारी) प्राप्त अहवालानुसार एकाच दिवसात तब्बल 345 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढलले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर : सोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहर आणि जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्ट सुरु झाल्यापासून रुग्णांचे निदान होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ग्रामीण भागात मागील तीन दिवसात तब्बल 1027 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, केवळ तीन दिवसात 28 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. इकडे शहरात देखील कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे.
ग्रामीण भागात आज (सोमवारी) प्राप्त अहवालानुसार एकाच दिवसात तब्बल 345 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढलले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार ग्रामीण भागात 311 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी 371 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे केवळ तीन दिवसात ग्रामीण भागात 1027 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागात वाढत्या कोरोनाच प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर परिसरात 13 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंढरपुरात आज प्राप्त अहवालानुसार एकाच दिवसात 124 रुग्णांची भर पडली आहे. तर दोघांनी आपला प्राण गमावला आहे. तर आतापर्य़ंत बार्शी तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्णांनी जीव गमावला आहे. बार्शी तालुक्यात आज 50 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर दोघांनी आपला जीव गमावला आहे.
बार्शी तालुक्यात आतापर्यंत 1198 जणांना कोरोनाची लागण आहे. तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पंढरपुरात ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. पंढरपुरात आतापर्यंत 1085 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत 561 पॉझिटिव्ह तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यात 268 पॉझिटिव्ह आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यात 427 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 11 जणांनी आपला जीव गमावला.
इकडे माळशिरस तालुक्यात देखील 474 जण कोरोना बाधित झाले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू माळशिरस तालुक्यात झाला आहे. मंगळवेढा तालुक्यात 198 जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरालगत असलेल्या मोहोळ तालुक्यात 368 जण कोरोना बाधित असून त्यापैकी 11 जणांचा बळी गेला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात 402 जण पॉझिटिव्ह असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्यात 199 जण कोरोना बाधित असून तिघांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात आतापर्यंत 722 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील एकूण परिस्थिती पाहता आतापर्य़ंत 5902 जणांना कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी 172 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3333 जण बरे देखील झाले आहेत. उर्वरित 2397 रुग्णांवर मात्र उपचार सुरु आहेत.
पाहा व्हिडीओ : Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा
सोमवारी दुपारी प्राप्त अहवानुसार सोलापुर शहरात काल 480 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 442 जणांचे अहवाल हे नेगेटिव्ह आढळले आहेत. तर 38 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर शहरातील तिघांचा मृत्यू देखील कोरोनामुळे झाला आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत 39224 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 39146 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामधील 33686 जणांचे अहवाल हे नेगेटिव्ह असले तरी 5460 रुग्णांचे अहवाल मात्र पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालं आहे.
सोलापूर शहरात आज प्राप्त अहवालानुसार एका दिवसात 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्य़ंत शहरातील 4065 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. तर 383 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर उर्वरित 1012 रुग्णांवर शहरात उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- सार्वजनिक वाहतुकीच्या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडीचं 'डफली बजाव' आंदोलन
- "कोविड पॉझिटिव्ह नको असेल, तर फाटके कपडे घाला" : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे
- 'कामं होतं नसतील तर दंगा करा' मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
- खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश : राजेश टोपे
- अमेरिकेत कोरोनामुळे एक डिसेंबरपर्यंत तीन लाख लोकांचा जीव जाण्याची शक्यता : मॉडेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement