Nitin Raut : दिल्लीकडून येणाऱ्या प्रवाशांमुळे शहरात वाढतोय कोरोना, ऊर्जामंत्र्यांची माहिती
Nagpur : शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिल्लीकडून येणारे बहुतांश प्रवासी पॉझिटिव्ह निघत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले.
Nagpur : नागपुरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यावर दिल्लीकडून येणारे बहुतांश प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरच टेस्टिंग करुन उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली.
नागपूर विमानतळावर आगमन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भातील आपण जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्याशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, 'नागपूरात दिल्लीकडून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. यावर उपाय म्हणून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर आमचा भर आहे. शहरातील नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि गर्दीमध्ये जाणे टाळावे. नागरिकांच्या आरोग्यसाठी सर्वतोपरी प्रय़त्न करणार आहे.'
शहरातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 20वर
शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. आज करण्यात आलेल्या एकूण 181 टेस्टपैकी 178 टेस्ट निगेटिव्ह तर 3 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले.
उपराजधानीत वाढतोय 'कोरोना ग्राफ'
Nagpur: जिल्ह्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसल्यानंतर पुन्हा आता मे आणि जूनमध्ये रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांचा ग्राफ हा 44 टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यात मे च्या पहिल्या आठवड्यात 7 रुग्ण, दुसऱ्या आठवड्यात 17 तर तिसऱ्या आठवड्यात 12 रुग्ण पॉझिटिव्ह होते. दरम्यान रुग्ण संख्येत घट झाली असली तरी मे च्या शेवटच्या आठवड्यात 20 रुग्णांची भर झाली. तर 29 मे ते 4 जून दरम्यान 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्टवर असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
रुग्णसंख्या मे 2022
1 ते 7 मे 07 रुग्ण
8 ते 14 मे 17 रुग्ण
15 ते 21 मे 12 रुग्ण
22 मे 28 मे 20 रुग्ण
29 मे ते 4 जून 36 रुग्ण
6 जून 3 रुग्ण
वाचा
Nagpur Covid Testing Centers : येथे करा निःशुल्क कोव्हिड चाचणी
राज्यातील शिवसेना आमदारांची स्थिती वाईट, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला