एक्स्प्लोर

कोरोनामुळं एसटीला 2300 कोटींचा फटका, लाखो कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गंभीर

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला चांगलाच बसलाय. कोरोनामुळं एसटीचं 2300 कोटींचं नुकसान झालं आहे. यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा जून, जुलै महिन्याचा पगार रखडणार असल्याची चिन्हं आहेत. राज्यातील एसटीच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला चांगलाच बसलाय. कोरोनामुळं एसटीचं 2300 कोटींचं नुकसान झालं आहे. यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा जून, जुलै महिन्याचा पगार रखडणार असल्याची चिन्हं आहेत. राज्यातील एसटीच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आणि लॉकडाऊनमुळं 113 दिवसाच्या कालावधीत एसटीचा 2300 कोटींचा महसूल बुडालाय. तर राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या एसटी सेवेला कोरोनामुळे प्रवासी कमी मिळत असल्यानं साहजिकच याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नवर झालाय. परिणामी जून, जुलै महिन्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ड्युटी करणाऱ्या, परप्रांतीय कामगारांना मध्य प्रदेश सीमेपर्यंत पोचवणाऱ्या, राजस्थानमधील कोटा येथून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभाग, जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सुखरूपपणे सोडणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवारावर सध्या उपासमारीची पाळी आलीय. 50  टक्के पगारात घर कसं चालवायचं? असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावत असतांना एसटी प्रशासनानं 20 दिवस अर्जित रजेचा फतवा काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर घातलीय. एसटीला ऐतिहासिक फटका; कोरोना, लॉकडाऊमुळे एसटीने काय गमावलं? एसटी महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांनी राज्याच्या अर्थसंकल्पातच एसटीसाठी तरतूद असावी अशी आग्रही मागणी केली होती. एसटीच्या अर्थसंकल्पाच्या साधारण 40 ते 50 टक्के खर्च हा आस्थापनेवर होत असतो. एसटीची आर्थिक परिस्थिती पाहता एसटीचं शासनाकडे असलेलं घेणं तरी शासनाने द्यावं, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी तसेच इतर अन्य महत्वपूर्ण कामांसाठी एसटीला साधारण साडेचारशे कोटीच्या निधीची मदत करण्याची मागणी सरकार कडे करण्यात आलीय. मात्र सरकार याला किती प्रतिसाद देतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. एसटी महामंडळातील दीड हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित संघटनांकडून निवेदनाचा पाऊस देशातील इतर राज्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य केले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याचे 50 टक्के तसंच जून महिन्याच्या संपूर्ण वेतनाकरीता 500 कोटी रूपये तात्काळ देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर एसटीच्या इतर संघटनांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. संघटनांच्या भूमिका या नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना कोणती संघटना आक्रमकपणे सरकार दरबारी संघर्ष करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देते, याबाबत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget