एक्स्प्लोर

पंढरपूरच्या 'त्या' विकास निधीवरुन स्थानिकांमधून उलट-सुलट चर्चा

कॅनडा सरकार पंढऱपूरच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये देणार असल्याच्या बातमीनंतर, वारकरी आणि लोकांमध्ये बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या आहेत.

पंढरपूर : कॅनडा सरकार पंढऱपूरच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये देणार असल्याच्या बातमीनंतर, वारकरी आणि लोकांमध्ये बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या आहेत. तसेच वारकरी संघटनेचं मुंबईतील आंदोलन हाणून पाडण्यासाठी मंदिर समितीच्या अध्यक्षांनी ही नामी युक्ती शोधल्याचा आरोप वारकऱ्यांमधून होत आहे पंढरपूर शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकार 2 हजार कोटी निधी देणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी नुकतीच दिली होती. भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं होतं. तसेच, 3 ऑक्टोबरला काऊन्सिल जनरल ऑफ कॅनडा पंढरपुरात येणार आहेत. या योजनेसाठी कॅनडा सरकार आणि मंदिर समिती, नगरपरिषद यांच्यात करार होणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पण या निधीवरुन वारकरी आणि स्थानिक नागरिकांमधून उलट-सुलट चर्चा सुरु आहे. कॅनडानं दिलेल्या पैशांची परतफेड कोण करणार? दक्षिण भारतातील तिरुपतीसारखी देवस्थानं सोडून, कॅनडा सरकारने पंढऱपूरचीच निवड का केली? तसेच इतक्या मोठ्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी न करता पंढरपूर मंदिरांच्या अध्यक्षांनी कशी केली? असे विविध प्रश्न स्थानिकांमधून विचारले जात आहेत. विशेष म्हणजे, 10 ऑक्टोंबर रोजीचं वारकरी संघटनेचं मुंबईतील आंदोलन हाणून पाडण्यासाठी मंदिर समितीच्या अध्यक्षांनी ही नामी युक्ती लढवल्याचा आरोप काही वारकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, “निधीसंदर्भातील आक्षेपांवर उत्तर देताना अध्यक्ष भोसले यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठूरायाच्या नगरीचा कायापालट झाला पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. त्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्नही सुरु होते.” “यासंदर्भात कॅनेडा सरकारच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव परदेशींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला कॅनेडा सरकारचे काऊन्सिल जनरल उपस्थित होते. त्यांना दोन्ही देशांच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे अधिकार असतात. तसेच, मुख्यमंत्र्यांनी याबाबतची 6 महिन्यांपूर्वी घोषणा केली होती,” असंही भोसले यांनी सांगितलं. संबंधित बातम्या पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून 2 हजार कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Under 19 Asia Cup Women Team India  : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषकRajasthan Girl Bowling| झहीरसारखी गोलंदाजी करणाऱ्या सुशीलाचं सचिनकडून कौतुक Special ReportPopcorn GST | सिनेमागृहात पॉपकॉर्नच्या चवीनुसार तीन वेगवेगळे GST Special ReportPawan Chakki Special Report : पवनचक्कीचं 'रक्तरंजित' अर्थकारण,  पवनचक्की उद्योगाचं वारं का दूषित?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget