एक्स्प्लोर

राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय; किमान वेतन कायद्याअंतर्गत मसुदा, समान काम-समान दाम

नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी आणि करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी आणि करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. श्रमिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं शासनाने वेतन वाढीच्या अधिसूचनेचा मसुदा 6 मार्च 2025 रोजी जाहीर केला आहे. या कामगार हिताय निर्णयासाठी श्रमिक सेनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढ विषयी शासन स्तरावर पाठपुरावा करणारे वने मंत्री गणेश नाईक यांचे प्रत्यक्ष भेटून राज्यभरातील कंत्राटी कामगारांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

लाखो कामगारांना मोठा दिलासा 

श्रमिक सेनेच्या प्रयत्नांमुळे न केवळ नवी मुंबई महापालिका आणि परिवहन सेवेमधील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे तर या निर्णयाचा  राज्यभरातील अ, ब, क, ड आणि उर्वरित भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लाखो कंत्राटी कामगारांना लाभ होणार आहे. असे असले तरी कंत्राटी कामगारांना अधिक वेतन वाढ देण्याची मागणी डॉ संजीव नाईक यांनी केली आहे. वाढणारी महागाई पाहता प्रत्येक वर्षी नियमितपणे वेतन वाढ व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महायुती सरकारने गतीमान सरकार म्हणून काम करण्याचा निश्चय केला : आकाश फुंडकर 

संजीव नाईक यांच्या श्रमिक सेनेने हा प्रश्न मांडला होता. राज्यातील लाखो कामगारांचा हा प्रश्न आहे. त्यासाठी मसुदा जाहीर केला असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. 
2 महिन्यात सूचना व हरकती आल्यावर आम्ही तात्काळ निर्णय घेणार आहोत. महायुती सरकारने गतीमान सरकार म्हणून काम करण्याचा निश्चय केला आहे. सर्व कामगारांच्या जीवनात यामुळे मोठा बदल दिसेल असेही आकाश फुंडकर 

दोन महिन्यात सूचना व हरकतीनंतर मदुद्याला कायद्याचे स्वरुप मिळणार

राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. किमान वेतन कायद्याअंतर्गत मसुदा जाहीर झाला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मसुदा जाहीर केला आहे. कंत्राटी कामगारांना समान कामास समान वेतन देण्याचा हा मसुदा आहे. श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी याबाबतची मागणी केली होती. दोन महिन्यात सूचना व हरकती सादर कराव्या लागणार आहेत. सूचना व हरकती नंतर मसुद्याला कायद्याचे स्वरुप मिळणार आहे. सर्व महापालिका, नगर परिषद व इतर आस्थापनांमधील कामगारांना फायदा होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: इकडं मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गटातून भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद अन् संजय राऊत कडाडले! तिकडं शिंदे सुद्धा 'मनसे' बोलले..
इकडं मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गटातून भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद अन् संजय राऊत कडाडले! तिकडं शिंदे सुद्धा 'मनसे' बोलले..
Eknath Shinde and Raj Thackeray: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Eknath Shinde: बाळासाहेबांची स्वप्नं मोदींनी पूर्ण केली, एनडीए आम्हाला मान सन्मान देतं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
बाळासाहेबांची स्वप्नं मोदींनी पूर्ण केली, एनडीए आम्हाला मान सन्मान देतं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
Nashik Air Show 2026: वंदे मातरम्! नाशिकमध्ये 'सूर्यकिरण एअर शो'चा थरार, लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांची पारणे फेडली, PHOTO
वंदे मातरम्! नाशिकमध्ये 'सूर्यकिरण एअर शो'चा थरार, लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांची पारणे फेडली, PHOTO

व्हिडीओ

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं, शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Ishwar Tayade On Sarita Mhaske : सरिता म्हस्के लक्ष्मी दर्शनासाठी २ दिवस गायब होत्या, तायडेंची टीका
Nagpur BJP Banner : भाजपने राज्यभर लावलेल्या एका होर्डिंगची मोठी चर्चा
Vikas Gogawale Arrested : विकास गोगावले अखेर महाड पोलिसांना शरण
Badlapur Crime News :  लैंगिक शोषणाच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं, मोठी माहिती समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: इकडं मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गटातून भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद अन् संजय राऊत कडाडले! तिकडं शिंदे सुद्धा 'मनसे' बोलले..
इकडं मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गटातून भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद अन् संजय राऊत कडाडले! तिकडं शिंदे सुद्धा 'मनसे' बोलले..
Eknath Shinde and Raj Thackeray: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Eknath Shinde: बाळासाहेबांची स्वप्नं मोदींनी पूर्ण केली, एनडीए आम्हाला मान सन्मान देतं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
बाळासाहेबांची स्वप्नं मोदींनी पूर्ण केली, एनडीए आम्हाला मान सन्मान देतं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
Nashik Air Show 2026: वंदे मातरम्! नाशिकमध्ये 'सूर्यकिरण एअर शो'चा थरार, लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांची पारणे फेडली, PHOTO
वंदे मातरम्! नाशिकमध्ये 'सूर्यकिरण एअर शो'चा थरार, लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांची पारणे फेडली, PHOTO
COMPETITIVE Bid For RCB: किंग कोहलीच्या आरसीबीला खरेदी करण्यासाठी पहिला ग्रुप समोर आला! किती हजार कोटीत सौदा होणार?
किंग कोहलीच्या आरसीबीला खरेदी करण्यासाठी पहिला ग्रुप समोर आला! किती हजार कोटीत सौदा होणार?
BMC Mayor 2026 Sheetal Gambhir Desai: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून लढल्या, 125 मतांनी जिंकल्या; फडणवीसांकडून सभेत उल्लेख, आता मुंबईच्या महापौरपदासाठी आघाडीवर, कोण आहेत शीतल गंभीर?
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून लढल्या, 125 मतांनी जिंकल्या; आता मुंबईच्या महापौरपदासाठी आघाडीवर, कोण आहेत शीतल गंभीर?
Pune Loni Kalbhor Accident: चिमुकला सायकलवर खेळत होता, अचानक कार आली अन् सगळे हादरले...; पुण्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना
चिमुकला सायकलवर खेळत होता, अचानक कार आली अन् सगळे हादरले...; पुण्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना
Harish Daroda : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याला जेलमध्ये हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जीव सोडला, भात खरेदी घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याला जेलमध्ये हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जीव सोडला, भात खरेदी घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
Embed widget