एक्स्प्लोर
मंडपाबाहेरील वऱ्हाडींना कंटेनरने चिरडलं, सात जणांचा मृत्यू
लाखनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ही घटना घडली. ज्यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
भंडारा : लग्नासाठी आलेल्या 15 ते 20 जणांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना भंडारा जिल्यातल्या लाखनी तालुक्यात घडली आहे. लाखनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ही घटना घडली. ज्यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रेसलँड लॉनसमोर उभ्या असलेल्या 15 ते 20 लोकांना रायपूरच्या दिशने येणाऱ्या कंटेनरने चिरडलं. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला, तर 10 ते 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. काही वऱ्हाडींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर काहींना लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
लाखनी तालुक्यातल्या जगनाडे कुटुंबीयांचा हा लग्न सोहळा होता. नागपुरातील हारगुडे कुटुंबीय वऱ्हाड घेऊन आले होते. संध्याकाळी साडे सात वाजता लग्न लागलं. हॉलमध्ये गर्दी होती म्हणून वऱ्हाडी बाहेर रस्त्यावर उभे होते.
याचवेळी रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने वऱ्हाडींना जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की घटनास्थळीच सहा लोकांचा मृत्यू झाला. तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement