Nana Patole : मोदी सरकार म्हणजे बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका
मोदी सरकार म्हणजे बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी असल्यासारखे आहे. देशाला एकच माणूस संभाळू शकतो, अशी वल्गना केली जात होती. मात्र आज चित्र समोर आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर टीका केलीय.
Nana Patole : मोदी सरकार म्हणजे बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी असल्यासारखे आहे. देशाला एकच माणूस संभाळू शकतो, अशी वल्गना केली जात होती. मात्र लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election जे निकाल आले त्यात काय झालं त्याचं, या घटनेला जबाबदार केंद्र सरकार आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स (Indo Amines) कंपनीत आज आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. सतत घडणाऱ्या या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
यावरून नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. खऱ्या अर्थाने हे सरकारचं अपयश आहे. वारंवार तिथे या घटना होतं आहेत. अनधिकृत कंपन्यांचं आॉडीट करून त्यांना परवानगी द्यावी. मूळात सरकारचं अशा अनधिकृत गोष्टींना पाठींबा असल्याने या चुकीच्या गोष्टी घडत आहेत. सरकारचं याला कारणीभूत आहे. असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी डोंबिवलीतील आजच्या घटनेसाठी सरकारला जबाबदार ठरवले आहे.
संघ आता का सल्ले देत आहे?
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) आणि त्यांच्या निकालानंतर संघ नेतृत्वाची जाहीर भूमिका पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्वाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फक्त काँग्रेस किंवा इंडी आघाडीच्या पक्षांनाच धारेवर धरले नाही, तर भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना ही जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत. याविषयी बोलतांना नाना पटोले म्हणाले कि, संघ का सल्ले देत आहे? भाजपचे नेते म्हणत आहेत की संघाला आम्ही माणत नाही. असे ते स्पष्ट सांगत असताना संघ का सल्ले देत आहेत. अर्थात त्यांच्या पक्षाबाबत मी जास्त बोलणं योग्य नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
आता रिझल्ट समोर दिसत आहे
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितले मी कोणावरही टीकेला उत्तर देणार नाही. मी कामात लक्ष देतो त्यामुळे तुम्हाला आता रिझल्ट दिसत आहे. कोणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नसल्याचे नाना पेटोले म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेला जागावाटपात वर खाली होऊ शकतं, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या