एक्स्प्लोर
Advertisement
राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का ?, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस राज्यपालांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना आणि भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रवादीला आमंत्रण दिलं आहे. राष्ट्रावादीला सत्ता स्थापन कऱण्यात अपयश आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर मुंबई काँग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत ट्वीट करत ‘राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का?’ अशी खोचक टीका केली आहे.
सचिन सावंत आपल्य ट्विटमध्ये म्हणाले, ‘राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का?’ सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल’
राज्यपाल हे #भाजपा चे बाहुले आहेत का? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटी शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल
— Sachin Sawant (@sachin_inc) November 12, 2019 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस राज्यपालांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयातया संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते. भाजपाला सत्तास्थापनेसठी अपयश आल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं स्पष्ट होतं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement