एक्स्प्लोर
पुणे काँग्रेस भवनची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत : संग्राम थोपटे
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. मात्र तोडफोड करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मात्र ते माझे कार्यकर्ते आहेत की नाही, याची तपासणी करावी लागेल, असं आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.
पुणे : काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. मात्र तोडफोड करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मात्र ते माझे कार्यकर्ते आहेत की नाही, याची तपासणी करावी लागेल, असं आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे. पुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड करणारे संग्राम थोपटे यांचे कार्यकर्ते नाहीत, तर कुणाचे आहेत, असा प्रश्न संग्राम थोपटे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाला आहे.
काल काँग्रेस भवनाची तोडफोड करणारे आमचेच कार्यकर्ते होते का हे स्पष्ट नाही. ही तोडफोड कुणी केली याची तपासणी आपण करणार आहोत, मात्र ते कार्यकर्ते माझे नाही, असं संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्ही अंतिम मानतो. कालची घटना काँग्रेस पक्षाला शोभणारी नाही. पक्षाला जे योग्य वाटलं तोच निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. पुणे जिल्ह्याची काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी पुण्याला एखादं मंत्रिपद देण्याची अपेक्षा होती. गुंडगिरी आणि चुकीच्या प्रकाराला पक्षात थारा नाही, असं सांगत कालच्या घटनेचा निषेध आमदार थोपटेंनी केला.
पाहा व्हिडीओ : काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थकांचा राडा
काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मात्र ते माझे आहेत की, नाही हे तपासावं लागेल. पुणे शहरातही अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. गेली तीन टर्म मी आमदार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना सहाजिक काही अपेक्षा असतात. नेता घडवण्यासाठी कार्यकर्ते रक्ताचं पाणी करत असतात. त्यामुळे माझा नेता विधानसभेत गेला तर त्याला मंत्रिपद मिळावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा असते. मात्र कालची घटना निंदनीय आहे, अशा घटनांचं समर्थन करता येणार नाही.
दरम्यान, संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुणे काँग्रेस भवनावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हल्लाबोल केला होता. पुण्यातील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांकडून जबरदस्त तोडफोड करण्यात आली होती. तेथील खुर्च्यांची आणि टेबलांची तोडफोड केली होती. या ठिकाणी संग्राम थोपटे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच, बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. संग्राम थोपटे यांनी पक्षासाठी मेहनत घेतली होती. संग्राम थोपटे आमचं आशास्थान आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं म्हणून आम्ही काँग्रेस भवन फोडलं, असं युवा कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थकांचा राडा, पुणे काँग्रेस भवनाची कार्यकर्त्यांकडून तुफान तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement