एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना भाजपच्या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही खुश, मतविभाजन टळण्याची आशा
युती झाल्याने विरोधी पक्षासाठी मात्र एक गोष्ट झाली की भाजप सरकार विरोधातील जी मतं शिवसेना घेऊ शकत होती, त्या मतांचं विभाजन आता टाळलं जाईल. शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत हे आता स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षांना राज्यात जागा मोकळी झाली आहे.
मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणं हे विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. सत्तेत असूनही शिवसेना सरकारवर टीका करत होती, त्यामुळे विरोधकांची जागाही शिवसेनेने व्यापली होती. आता मात्र युती झाल्याने शिवसेनेमुळे विरोधकांचं होणारं मतविभाजन टाळलं जाईल, अशी आशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत आहे.
केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असूनही भाजप आणि शिवसेनेचा नेहमीच 36 चा आकडा राहिला आहे. सत्तेत मंत्री असूनही केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या अनेक धोरणांवर कधी जाहीर भाषणांमधून तर कधी 'सामना'मधून टीका होत राहिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेने खालच्या थरावर जाऊन या दोघांवर टीका केली. लोकसभा असो की विधानसभा दोन्हीकडे सरकारच्या धोरणावर शिवसेनेचे खासदार आणि आमदार तुटून पडायचे. विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आहे की शिवसेना असं वातावरण या चार वर्षात अनुभवायला मिळालं.
युती झाल्याने विरोधी पक्षासाठी मात्र एक गोष्ट झाली की भाजप सरकार विरोधातील जी मतं शिवसेना घेऊ शकत होती, त्या मतांचं विभाजन आता टाळलं जाईल. शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत हे आता स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षांना राज्यात जागा मोकळी झाली आहे.
सरकार विरोधातील रोष पाहता युतीसाठी भाजपने बरेच प्रयत्न केले. एकीकडे देशात मोदी विरोधकांची मोट बांधली जात असताना भाजपला आपल्या मित्रपक्षाला युतीत टिकवण्यासाठी मेहनत करावी लागली. गेल्या चार वर्षात भाजप आणि शिवसेना समर्थांकामध्ये टोकाचे वाद आहेत..युती झाली तरी या समर्थकांनी एकत्र येऊन एकत्र काम करणं, आणि एकमेकांची मतं युतीच्या उमेदवारांना मिळवून देणं हे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement