एक्स्प्लोर

अजित पवार यांचा कैलास गोरंट्याल यांना फोन, काँग्रेसच्या आमदारांचं उपोषण रद्द

निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचं सांगत काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं होतं. मात्र अजित पवार यांच्या फोननंतर उपोषण रद्द करत असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलं.

जालना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषण रद्द केलं आहे. निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचं सांगत पक्षाचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कैलास गोरंट्याल यांनी दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. "आम्ही दुजाभाव करत नाही. परंतु यापुढे निधी वाटपाबाबत तुमचा प्राधान्याने विचार करु," असं आश्वासन अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांना दिल्याचं समजतं. त्यानंतर गोरंट्याल यांनी समाधान व्यक्त करत उपोषण रद्द करत असल्याचं सांगितलं.

जालना शहरासह मतदारसंघातील विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. निधीसाठी काँग्रेसच्या 11 आमदारांनी पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळत नसल्यामुळे काँग्रेसमधील आमदार नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं होतं.

निधीवाटपात दुजाभाव होत असल्याने काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार!

शिवसेनेने हात झटकले निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या नाराजीचं उत्तर अजित पवार देतील, असं म्हणत शिवसेनेने या मुद्द्यावर हात झटकले. उपोषणाचा इशारा देणाऱ्या आमदारांचा 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला. 'सामना'त म्हटलं आहे की, "देशात मोदींचे सरकार आहेच, पण एका सक्रिय विरोधी पक्षाची संसदीय लोकशाही व्यवस्थेत तितकीच गरज आहे. काँग्रेसने सध्या अशा मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी असे जनमत तयार झाले आहे, पण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी काँग्रेसचे आमदार स्वत:च सहभागी असलेल्या सरकारविरोधात उपोषणाला बसत आहे. लोकशाही वगैरे आहे हे मान्य, पण त्यामुळे ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली, त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासाखरे होईल. काँग्रेसचे म्हणणे असे की, सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप मिळते. त्यामुळे विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला. यावर आम्ही काय बोलणार? अर्थमंत्री अजित पवार हेच या आरोपाला उत्तर देऊ शकतील. प्रत्येक पक्षाचा मंत्री आपापल्या कार्यकर्त्यांना झुकते माप देतच असतो, पण आमदारांचे म्हणाल तर ते लोकप्रतिनिधी असतात व त्यांच्या बाबतीत भेदभाव होऊ नये.

नाराजीचे कारण जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात तीन नगरपालिका आहेत. यामध्ये अंबड, परतूर आणि जालना आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यंत 29 कोटी रुपयांचा निधी आला होता. मात्र काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. विशेष म्हणजे या बाबतीत शिवसेना नेते जिल्हाप्रमुखांच्या बाबतीत नरमाईचे धोरण बाळगत, निधीसाठी एका लेटरवर सुद्धा शिवसेना नेत्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

Embed widget