एक्स्प्लोर

सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार : सूत्र

कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला कॉंग्रेसला पाठिंबा देऊ नये, असे म्हटले आहे. सत्तास्थापनेच्या या गोंधळात कॉंग्रेसने पडू नये, शिवसेनेला पाठिंबा देणे हे दोघांच्याही फायद्याचे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्ष चक्क शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची खात्रीशीर माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलेलं असलं तरी राज्यात महाशिवआघाडीचं सरकार सत्तेत येण्याच्या वृत्ताला आणखी बळकटी मिळाली आहे. जयपूरमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी येत्या काही तासात शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे महाशिवआघाडीबाबत बोलण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. तर भाजपसोबत युती करण्यास शिवसेना आमदार उत्सुक नाहीत, मात्र आघाडीसोबत जाण्यास अनुकुल आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. सरकार स्थापनेत भाजप अपयशी झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेना वाटाघाटीच्या सूत्रावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आज रात्री नऊ वाजता पुन्हा कॉंग्रेसची बैठक होणार आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवणे हे प्राधान्य हे मत आमदारांनी व्यक्त केलं असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला कॉंग्रेसला पाठिंबा देऊ नये, असे म्हटले आहे. सत्तास्थापनेच्या या गोंधळात कॉंग्रेसने पडू नये, शिवसेनेला पाठिंबा देणे हे दोघांच्याही फायद्याचे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र  जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. तर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास त्यांच्या विरोधात मतदान करु आणि ज्यावेळी सरकार कोसळेल त्यावेळी पर्यायी सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं कौतुक केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते तर त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज अशीच भूमिका मांडल्यानं महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केल्याची स्तुतीसुमनं संजय राऊत यांनी उधळली आहेत. बेळगाव-कारवारप्रश्नी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Video: मी आयुष्य पक्षात घालवलं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंचा कंठ दाटला, विक्रम काकडेंना उमेदवारी, पण सुनिल टिंगरेंही अर्ज भरला
Video: मी आयुष्य पक्षात घालवलं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंचा कंठ दाटला, विक्रम काकडेंना उमेदवारी, पण सुनिल टिंगरेंही अर्ज भरला

व्हिडीओ

Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं...
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, आकडेवारी सांगत म्हणाल्या...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Embed widget