एक्स्प्लोर

Lok Sabha 2024 Congress : मध्यममार्गी काँग्रेसचा राजकीय पटलावर 'लेफ्ट टर्न'! लोकसभा निवडणुकीसाठी वैचारिक रसद डाव्यांकडून?

Congress Lok Sabha : . भाजप आणि संघाच्या कॅडरचा वैचारिक मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने आता डावे वळण घेतले आहे, का अशी चर्चा सुरू झाली आहे.

नागपूर :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काही महिने उरले असताना दुसरीकडे भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे.  केंद्रातील भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि इंडिया (I.N.D.I.A. Alliance) आघाडीकडून कंबर कसली जात आहे. भाजप आणि संघाच्या कॅडरचा वैचारिक मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने आता डावे (Left Politics) वळण घेतले आहे, का अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला या निवडणुकीत सरकारविरोधातील वैचारिक रसद डाव्यांकड़ून पुरवली जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आहेत. 

काँग्रेस पक्षाचे डावीकरण होत आहे का? लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेस पक्षाला निवडणुकीचे मुद्दे आणि वैचारिक खाद्य पुरवण्याचे काम आता डावे करत आहेत का? आणि लोकसभा निवडणुकीसाठी वैचारिक रणनीतीनुसार लढणारे कार्यकर्ते आणण्यासाठी काँग्रेस डाव्या संघटनांकडे पाहत आहे का? असे सर्व प्रश्न उपस्थित होण्याची काही कारणं आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सध्या "भारत जोडो अभियान" अंतर्गत काँग्रेस पक्षाकडून "प्रशिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग" घेतले जात आहे. त्यामध्ये स्पष्टपणे काँग्रेस डाव्या विचारांकडे झुकत असल्याचे दिसून येत असल्याचे दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आरोप लावला. काँग्रेस पक्षाला शहरी नक्षलवादी नियंत्रित करत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाला कोण नियंत्रित करत याची चर्चा सुरू झाली. 'एबीपी माझा'च्या हाती काँग्रेसच्या 'भारत जोडो अभियान' अंतर्गत "लोकसभा मिशन 24" या नावाने सुरू असलेल्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाचा काही तपशील आला आहे. त्यामधून काँग्रेस डाव्या विचारसरणीकडे मार्गक्रमण करण्यासाठी तयार होत असल्याचे दिसून येत आहे.

कुठे आणि कसे सुरू आहे हे प्रशिक्षण वर्ग?

- ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स म्हणजेच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सध्या राज्यात सुरू आहे.. 
-  यात प्रशिक्षित झालेले प्रशिक्षक आगामी काळात महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणार आहेत.
- तीन दिवसांचा ऑनलाईन आणि दोन दिवसांचा ऑफलाईन असे दोन टप्प्यातील हे प्रशिक्षण आहे.
- रत्नागिरी, नागपूर, अकोला, पुणे आणि राज्यातील इतर काही शहरांमध्ये हे प्रशिक्षण दिले जात आहे.
- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी बुथ स्तरापासून मतदारसंघ स्तरापर्यंतचे नियोजन कसे करावे याचे प्रशिक्षण यात दिले जात आहे.

प्रशिक्षण वर्गात सांगितले गेलेले मुद्दे

-  नवीन स्वयंसेवक कार्यकर्ते मिळवण्यासाठी इतर संघटनासह डाव्या संघटनांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यास सांगण्यात येत आहे.
- सरकारवर नाराज असलेल्या घटकांना शोधून त्यांचे नेटवर्किंग तयार करा. 
- सरकारी धोरण विरोधात अभियान राबवा. त्यासाठी एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेतील नाराज विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवा.
- कामगार वर्गातील मुद्द्यांना प्राधान्य द्या. सरकारच्या  कामगारविरोधी धोरणांवर भर द्या. 
- 500 पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेल्या व्हाट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट तसेच 500 पेक्षा जास्त फॉलोविंग असलेल्या युट्युबरला शोधून त्यांच्यासोबत संपर्क ठेवून त्यांना आपल्याकडे वळवा.
-  हे करताना कायदेविषयक अडचणी येऊ नये म्हणून कायदेविषयक सेवा देणारी यंत्रणा उभी करण्यासही सांगण्यात येत आहे..

लोकसभा सारखी मोठी निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष मतदारसंघ निहाय नियोजन आणि तयारी करतच असतो. मात्र, काँग्रेसच्या 'भारत जोडो' अभियान अंतर्गत रत्नागिरी आणि नागपूरच्या प्रशिक्षण वर्गात जे सादरीकरण आणि प्रशिक्षण दिले गेले. त्यात सरकारवर नाराज घटकांना शोधून त्यांचे  एक  नेटवर्किंग तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारी धोरण विरोधी अभियान राबवा, त्याला गती द्या असे ही सांगण्यात असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतच्या मूळ विचारसरणी पासून लांब जाऊन डाव्या विचारसरणीकडे झुकत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे डावीकरण होत असल्याचे निश्चितच दिसून येत आहे. मात्र, ही प्रक्रिया आज तीव्र गतीने होत असताना दिसत असली. तरी ती आधीच सुरू झाली होती. पहिल्या युपीए सरकारच्या कार्यकाळामध्येच डाव्या विचारांच्या स्वयंसेवी संस्था आणि आघाडीचे डावे विचारवंत यांचा सहभाग असलेली राष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन झाली होती. तेव्हा या कमिटीचे काम हे धोरण निश्चित करण्यासाठी सरकारला मदत करणे हे होते. त्यामुळे पहिल्या युपीए सरकारच्या काळापासूनच काँग्रेसवरील डाव्या विचारांचा प्रभाव राष्ट्रीय पातळीवर स्पष्ट झालेला होता. मात्र, नंतरच्या काळात जेव्हा काँग्रेस मधील काही महत्त्वाच्या नेत्यांनी ( जी-23 ) राहुल गांधींच्या नेतृत्वाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर काँग्रेसच्या डावीकरणाची गती वाढली.

दरम्यान, काँग्रेस पक्षाला मात्र हे आरोप मुळीच मान्य नाही. भारत जोडो यात्रा असो किंवा त्यानंतरचे नियोजन,  काँग्रेसची रणनीती काँग्रेसचे नेतेच तयार करतात. सध्या मोदी स्वतः अडचणीत असल्याने ते आणि भाजप चुकीचे आरोप करत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले. तर, काँग्रेसचे डावीकरण होत आहे, या मुद्द्याशी भाजप सहमत असून काँग्रेस स्वतःच्या विचारसरणीपासून दुरवला असल्याचा भाजपने आरोप केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget