(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खोटारडेपणा यांच्या मुखात, विचारात अन् विचारधारेतही, यांचा डीएनएच खोटा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर घणाघाती टीका
Vijay Wadettiwar: सत्तेत बसून गांधी, नेहरूला जर तुम्ही जबाबदार धरत असाल, तर तुम्ही सत्तेत कशाला आहात? सरकारी पैशातून मेजवानी कशाला मारत आहात? असा सवाल करत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे.
Nagpur News नागपूर : सत्तेत बसून गांधी आणि नेहरूला जर तुम्ही जबाबदार धरत असाल, तर तुम्ही सत्तेत कशाला बसले आहात? सरकारी पैशातून मेजवानी कशाला मारत आहे. बोट काँग्रेसला दाखवायचे, हे कशासाठी. सोयाबीनला हमीभापेक्षा कमी भाव मिळत आहे. पंतप्रधानांनी बोलताना या नतंभ्रष्टाचार लोकांकडून माहिती घ्यावी. काँग्रेसने मेट्रोला मंजुरी दिली होती, मात्र आता सत्ता गेली. ते स्वतःचे अपयश झाकण्याचे काम करत आहे. खोटारडेपणा यांच्या मुखात आहे. विचारात आहे. यांच्या विचारधारेतही आहे. मुळात यांचा डीएनए खोटा आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
आमचा दोनशेचा टप्पा पार करून सध्याचे असंविधानिक सरकार जाईल
राहुल गांधीची यात्रा देशभरात गाजली. देशातील विषमता दूर करण्याचे काम राहुल गांधी यांनी केलं. सर्व -जाती धर्मात समानता यावी, जाती-जातीत विष कालवण्याचे काम सुरू होतं, त्याला आता जनता संतापली आहे. त्यानुसार आता हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचा निकाल आम्हाला आमच्या बाजूने असेल, असे अपेक्षित आहे. मोदींच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पर्धेचा प्रवास सुरू झाला होता. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्या घेऊन सत्तेत यांना यावं लागलं. पण चार राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर यांना खुर्ची खाली करावी लागणार आहे. हरियाणा आणि काश्मीर या दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडी बहुमताने जिंकत आहे. महाराष्ट्रात आमचा दोनशेचा टप्पा पार करून असंविधानिक सरकार जाईल.असा विश्वासही विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) यावेळी बोलून दाखवला. ते नागपूर येथे बोलत होते.
लाडकी बहिणीच्या माध्यमातून मोठमोठे इव्हेंट
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवारांनी राज्यातील लाडकी बहीण योजनेवरुनही सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी ते म्हणाले की, रॅम्प तयार करून मोठमोठे इव्हेंट लाडकी बहिणीच्या माध्यमातून सादर केले जात आहे. गाडीत बसा, नाहीतर दीड हजार मिळणार नाही. लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात गर्दी करून इव्हेंट करण्याचं काम करत आहे. चेंगराचेंगरी होत आहे. बहिणीच्या एका पिशवीत टाकायचे आणि दुसऱ्या पिशवीतून काढून घेण्याचा काम सरकार करत असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केलीय.
जनता यांची जिरवला शिवाय राहणार नाही- विजय वडेट्टीवार
कुणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिलेला नाही. महाराष्ट्रात गुजराती जोडी सोडून नुकसान होत आहे. खोक्यांचं सरकार आहे, प्रत्येकाला खोक्यांची अपेक्षा आहे. खोके जिथे, तिथे आम्ही, म्हणणाऱ्यांनी खोके आहे, तिथे धोके आहे हे समजून घेतलं पाहिजे. जनता यांची जिरवला शिवाय राहणार नाही हे समजून घ्यावं. स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत नाही. अडीच वर्ष झाले त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. त्यावर टॅक्स लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांचा आशीर्वादाने सुरू आहे. त्यावर सरकारनी बोलावं. मात्र ते देशाची दिशाभूल करत आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा