एक्स्प्लोर
Advertisement
माझ्या मुलाला घराबाहेर काढा, रणजीत देशमुखांची पोलिसात तक्रार
मुलगा डॉ अमोल देशमुख बळजबरीने घरात राहात असल्याचं रणजित देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
नागपूर: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांनी स्वतःच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
मुलगा डॉ अमोल देशमुख बळजबरीने घरात राहात असल्याचं रणजीत देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने लावून धरणारे काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख आणि अमोल देशमुख हे सख्खे भाऊ आहेत.
रणजीत देशमुख यांची तक्रार
"माझा मुलगा डॉ अमोल देशमुख याने गेल्या काही महिन्यांपासून माझ्या परवानगीशिवाय, माझ्या मालकीच्या सिव्हिल लाईन्स येथील घरात बळजबरीने राहणे सुरु केले आहे. मी त्याला माझ्या संपत्तीतून(इस्टेट ) दोन बंगले राहायला दिले आहेत.
तरी तो त्याच्या कुटुंबियांसह तिथे न राहता माझ्याच घरी बळजबरीने शिरुन राहत आहे.
रोज घरी येणारे त्याचे मित्र आणि कार्यकर्त्यांमुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे, माझी प्रकृती ढासळत आहे, रक्तदाब वाढला आहे.
हे त्रास थांबविण्याकरिता 4 मे रोजी मी माझ्या घराच्या दाराला दोन कुलूप लावले होते. मात्र, 5 मे रोजी डॉ अमोल देशमुखने ते दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश केला.
त्यामुळे मजबुरीने आता मी माझ्या घरासमोर 4 गार्ड्स/सुरक्षा रक्षक ठेवले आहेत.
जर पोलिसांनी माझे घर रिकामे करुन दिले नाही, तर इथे काही अघटिक घडू शकते..."
असं रणजीत देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
कोण आहे अमोल देशमुख?
- डॉ अमोल देशमुख हे रणजीत देशमुख यांचे कनिष्ठ सुपुत्र आहेत.
- अमोल देशमुख हे 2014 मध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
- भाजप आमदार आशिष देशमुख आणि अमोल देशमुख हे सख्खे भाऊ आहेत.
- अमोल देशमुख यांनी हेल्थ केयर मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन केलं आहे.
- अमोल देशमुख यांनी नागपुरातील लता मंगेशकर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली.
- त्यानंतर त्यांनी पत्नी सूचिकासह लंडनला रवाना झाले. तिथे पत्नीने बाल रोग आणि जनरल सर्जरी अभ्यासक्रमात पदवी मिळवली.
- अमोल देशमुख यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement