मोठी बातमी! काँग्रेसची विधानसभेच्या 288 जागा लढण्याची तयारी सुरु, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरुय. महाराष्ट्रात काँग्रेसची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय.
Nana Patole : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी संपलेली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळच आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीर राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत असताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.
महाराष्ट्रात आम्ही सगळीकडं विधानसभेची तयारी चालू केली असल्याचे नाना पटोले म्हणाले. मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे, मला इथं यावं लागतं. इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. ते प्रश्न सोडवावे लागतात. पण, महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलं आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
नाना पटोलेंचा बैठकांचा सपाटा सुरु
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोली विधानसभेत त्यांनी जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. दरम्यान, गावात पोहोचल्यानंतर नागरिकांच्याही समस्या नाना पटोलेंनी अगदी आत्मीयतेनं जाणून घेतल्या आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी साकोलीचं नव्हे तर, महाराष्ट्रातील 288 जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचं वक्तव्य केलं.
शिवसेना ठाकरे गटही स्वबळावर निवडणूक लढवणार?
दरम्यान, एका बाजुला काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असतानाच, दुसरीकडे शिवसेठा ठाकरे गट देखील आगामी विधानसभा निवडणूक 288 जागांवर लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावरुन महाविकास आघाडीमध्ये काळ तणावाचे वातावरण देखील पाहायला मिळालं होतं.
महत्वाच्या बातम्या: