एक्स्प्लोर

भारत बंद : महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन, 21 पक्षांचा पाठिंबा

भारत बंद : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे.

भारत बंद मुंबई : काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला देशभरातील 21 प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रात या आंदोलनात कुठेही हिंसा झाली नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. शिवाय शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला.

भारत बंद LIVE UPDATE 

शिवसेना सत्तेसाठी लाचार, खरा मुखवटा स्पष्ट झाला : अशोक चव्हाण

विविध पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला : अशोक चव्हाण

बंदमध्ये राज्यात कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही : अशोक चव्हाण

मुंबईत काँग्रेसची पत्रकार परिषद

नवी दिल्ली इंधनाचे दर सरकारच्या हातात नाहीत, आंतरराष्ट्रीय कारणांमुळे तेलाचे दर वाढत आहेत, सरकारने महागाई कमी केली - केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद

मुंबई -  मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेची घोषणाबाजी, सिद्धिविनायक मंदिराजवळ ताफा अडवण्याचा प्रयत्न

मुंबई - दिंडोशीत भाजप नगरसेवकाचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं

कोल्हापूर - भारत बंदसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, घोषणा देण्यावरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात मारामारी, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मार खाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याने रॅलीतून पळ काढला

नवी दिल्ली  - शरद पवार यांचं रामलीला मैदानात भाषण 

सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी जी पावलं उचलायला पाहिजे होती ती या सरकारने उचलली नाहीत. त्यामुळे सामान्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र आलोय. देशाची अर्थव्यवस्था संकटात आणण्याचं काम या सरकारने केले. गॅसच्या किमती गगनाला भिडवणं, पेट्रोल-डिझेलची महागाई वाढवणं ही मोदी सरकारची बहादुरी आहे. चाळीस पंचेचाळीस वर्षात काहीच झालं नाही असं या सरकारचं म्हणणं असतं. पण विरोधात असताना वाजपेयींनी त्यांचे डोळे उघडले होते. चाळीस पंचेचाळीस वर्षांत काही झालं नाही असं म्हणणं म्हणजे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचाच अपमान आहे असे वाजपेयी एकदा म्हणाले होते, अशी आठवण शरद पवार यांनी करुन दिली. दिल्लीतील रामलीला मैदानावर सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

पुणे - मनसेने जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला. पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता महिला कार्यकर्त्या थेट मार्गावर झोपल्या. यामुळं पोलिसांची मात्र अबदा झाली, कारण तिथे महिला पोलीस उपस्थित नव्हत्या. साधारण पंधरा मिनिटं हे आंदोलन झालं, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या, तर पोलिसांची तारांबळ उडाली.

मुंबई - गोरेगावात मनसे कार्यकर्त्यांनी बसची हवा सोडली

ठाणे - मनसे आणि काँग्रेसकडून रिक्षावाल्यांना हात जोडून बंदचं आवाहन, रिक्षा बंद न करणाऱ्यांवर जबरदस्ती

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी बस डेपो बंद पाडला

नाशिक -  शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद, त्र्यंबकनाका परिसरातील तीनही पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल.

मुंबई  - मनसे कार्यकर्त्यांनी काही काळ मेट्रो रोखली, डी एन नगर स्टेशनजवळ मेट्रो बंद करण्याचा प्रयत्न, काही काळ  अडवल्यानंतर मेट्रो पुन्हा सुरु भारत बंद : महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन, 21 पक्षांचा पाठिंबा औरंगाबाद: काँग्रेससह इतर पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम औरंगाबादमध्ये पाहायला मिळतोय.शहरातील 50 पेक्षा अधिक आणि जिल्ह्यातील 200 पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल असोसिएशन घेतलेला आहे. औरंगाबाद शहरात मात्र जनजीवन सुरळीत आहे. शाळा महाविद्यालयेही सुरु आहेत. मात्र शहरातील बाजारपेठ बंद आहे. नंदुरबार– जिल्ह्यातील शहादा तालुक्यात अनोखा बंद.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून मार्केट, बाजारहाट सुरु ठेवण्याचं आवाहन. दुकानं सुरु ठेवा, पण बंदमध्ये सहभागी असल्याचे फलक दुकानासमोर लावण्याचे आवाहन. भारतात 2018 मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वाधिक वेळा जिल्हा बंद होता. आजही बंद झाल्यास व्यापारीचे नुकसान होऊ नये, त्यामुळे मार्केट सुरु ठेवण्याचं आवाहन. मुंबई – दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात मनसेकडून ‘अच्छ दिन’ची अंत्ययात्रा, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जवळपास 50 जण ताब्यात सांगली- भारत बंदचा सांगली जिल्ह्यातील एस टी वाहतुकीवर परिणाम. कर्नाटकहून सांगलीकडे येणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द. भारत बंदमुळे सांगली, मिरज बसस्थानकावर प्रवाशांची संख्या कमी राहुल गांधींकडून कैलाश यात्रेवरुन आणलेलं पाणी गांधीजींच्या समाधीवर अर्पण  शिर्डी - भारत बंदला संगमनेरमध्ये उस्फूर्त प्रतिसाद, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन. काँग्रेससह राष्ट्रवादीही आंदोलनात सहभागी. सोलापूर - काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला सोलापुरात अल्प प्रतिसाद मिळालाय. शहरातील 90 टक्के बाजारपेठा रोजच्या प्रमाणे चालू आहेत. नवीपेठेचा अपवाद वगळता शहराच जनजीवन सुरळीत चालू आहे. शाळा महाविद्यालये, हॉटेल, सार्वजनिक वाहतूक नियमित चालू आहे. बंदला राष्ट्रवादी, बसपा, सपा, माकपा आणि मनसेने पाठिंबा दिलाय. पंढरपूर - पंढरपूरमध्ये बंदला अल्प प्रतिसाद , एस्टी बसेस सर्व मार्गावर सुरळीत. अद्याप आंदोलक रस्त्यावर उतरलेले नाहीत . चेंबूर:  चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेचे अनोखे आंदोलन, पेट्रोलपंपावर आणलं गाढव भारत बंद : महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन, 21 पक्षांचा पाठिंबा नाशिक - सकाळी सव्वा सहापासून बंदला सुरुवात, एसटीच्या अनेक सेवा बंद, बाजारपेठा, रस्त्यांवर शुकशुकाट दादर  - दादरमध्ये शांततेत आंदोलन करु, कोणतीही तोडफोड होणार नाही,  जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ - मनसे चेंबूर: चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले मनमाड - इंधन दरवाढी विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला मनमाडमध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरात कडकडीत बंद. या बंदमध्ये रिक्षा,टॅक्सी, पेट्रोल पंप सहभागी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  तर मनमाड येथून नाशिकला जाणाऱ्या एसटी बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. मालेगाव, चांदवड,लासलगाव,नांदगाव येथे देखील कडकडीत बंद आहे. नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही बंदमध्ये सहभागी, राजघाटावर राहुल गांधींची उपस्थिती विरार -  इंधन दरवाढीविरोधात विरारमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. विरार पूर्व मनवेलपाडा तलावसमोर मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन रिक्षा, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेस बंद केल्या. मनसे अंगार है बाकी सब भंगार है, महागाई  कमी झालीच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मुरदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले आहेत शाह-फडणवीसांच्या फोनमुळे शिवसेनेचं 'भारत बंद'ला समर्थन नाही मुंबई- रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत, अनेक शाळा, महाविद्यालयेही सुरु राहणार

भारत बंद, तरीही पेट्रोल दरवाढ चालूच! 

पुणे - इंधन दरवाढीविरोधात आज भारत बंद, पुण्यात भारत बंद ला हिंसक वळण, मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी फोडली

देशभरातून कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा? समाजवादी पक्ष, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, तृणमूल काँग्रेस, आरएलडी, आरजेडी, सीपीआय, सीपीएम, एआयडीयूएफ, नॅशनल कॉन्फरन्स, जेएमएम, जेव्हीएम, डीएमके, आम आदमी पक्ष, टीडीपी, केरळ काँग्रेस (एम), आरएसपी, आययूएमएल, लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव), स्वाभिमानी शेतकरी संघटना सोनिया गांधीही आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता काँग्रेसने भारत बंदचं आवाहन केलं असलं तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आंदोलनात दिसणार नाहीत. त्यांनी नुकतीच कैलाश मानसरोवर यात्रा केली आहे. ते अजून दिल्लीत परतलेले नाहीत. सोनिया गांधी आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते मिळून सकाळी आठ वाजता राजघाटावर धरणं देणार आहेत. मोर्चा काढला जाण्याचीही शक्यता आहे. राज्यात आंदोलन कसं असेल? मुंबई -  काँग्रेस नेते संजय निरुपम, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांचं अंधेरी स्टेशन बाहेर सकाळी आठ वाजता आंदोलन असेल. मुंबई- राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचं सकाळी आठ वाजता गोवंडी स्टेशन आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता फ्री वे शिवाजी पुतळा इथे आंदोलन होईल. मुंबईतच सकाळी 10 वाजता भायखळाच्या पॅलेस सिनेमाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांचं आंदोलन होईल. मुंबई- मनसेचं दादरच्या सेनाभनव येथे आंदोलन होईल. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती असेल. सकाळी नऊ वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल, तर बोरीवलीत 10 वाजता आंदोलन असेल. सकाळी 10 वाजता मनसे नेते बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र सैनिक भारतमाता लालबाग येथे जमणार आहेत. नाशिक - काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचं एकत्र आंबेडकर पुतळा येथे सकाळी 10 वाजता आंदोलन होईल. औरंगाबाद - मनसेचं क्रांती चौकात सकाळी 11 वाजता आंदोलन होईल. दरम्यान, सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पेट्रोल पंप सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत बंद राहतील. काँग्रेससह अन्य पक्षांकडून ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर पंप चालकांनी निर्णय घेतला आहे. पुणे- कॅम्पमध्ये काँग्रेसचं दुपारी 12 वाजता आंदोलन असेल. कोल्हापूर - काँग्रेसचं सकाळी दहा वाजता काँग्रेस भवन इथे आंदोलन होईल. तर बिंदू चौकात शेकापचं आंदोलन असेल. सांगली - सकाळी दहा वाजता काँग्रेस भवन इथे आंदोलन होईल. सोलापूर – काँग्रेसचं सकाळी दहा वाजता आंदोलन असेल. रत्नागिरी – काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन असेल. बीड – सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन होईल. यवतमाळ – काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं बस स्थानकाजवळ सकाळी साडे दहा वाजता आंदोलन होणार आहे. जळगाव – काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाचं सकाळी अकरा वाजता आंदोलन होईल. उस्मानाबाद – शिवाजी चौकात सकाळी दहा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल. चंद्रपूर – गांधी चौकात सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल. नागपूर – रामनगर चौकात सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल. नांदेड – महात्मा फुले पुतळ्याजवळ सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल. हिंगोली – गांधी चौकात सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल. नंदुरबार – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
Vishalgad:  शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shatrughna Kate Chinchwad : चिंचवडमध्ये  शत्रुघ्न काटे बंडखोरी करण्याच्या तयारीत?Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP MajhaABP Majha Headlines : 01 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar PC | 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीनचीट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
Vishalgad:  शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
Kiran Mane : 'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
Embed widget