एक्स्प्लोर

Collage Reopen : मुंबई, पुण्यातील अनेक महाविद्यालयं प्रत्यक्ष बंदच, राज्याच्या इतर भागातील कॉलेज कॅम्पस फुलले 

Collage Reopen :  : कोरोनाच्या संकटामुळे (Corona Update) जवळपास दीड वर्ष बंद असलेली महाविद्यालयांची (Maharashtra Collage) दारं आजपासून पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहेत.

Collage Reopen :  : कोरोनाच्या संकटामुळे (Corona Update) जवळपास दीड वर्ष बंद असलेली महाविद्यालयांची (Maharashtra Collage) दारं आजपासून पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. मुंबई, पुण्यात (Mumbai Pune collage) मात्र अनेक महाविद्यालयं प्रत्यक्ष बंदच आहेत. मुंबईतील बहुतांश कॉलेज नियोजन न झाल्याने पदवी अभ्यासक्रमाचे ऑफलाइन वर्ग सुरू करणार नाहीत. पुण्यात देखील आज कॉलेज सुरु होण्याची शक्यता धूसरच आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून महविद्यालयांना ऐनवेळेस सूचना देण्यात आल्यात. 

मुंबईतील अगदी मोजक्या कॉलेजमध्ये ऑफलाइन वर्ग
मुंबईतील बहुतांश कॉलेज नियोजन न झाल्याने पदवी अभ्यासक्रमाचे ऑफलाइन वर्ग सुरू करणार नाहीत. मुंबईतील अगदी मोजक्या कॉलेज मध्ये ऑफलाइन वर्ग भरवले जात आहेत. आज कॉलेज सुरू होणार असल्याच विद्यापीठाने सांगून सुद्धा अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावले नाही.  मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना शनिवारी प्राप्त झाल्यानंतर अगदी दोन दिवस नियोजनाला मिळाले, त्यात सुद्धा विद्यार्थ्यांचा लसीकरणाबाबत माहिती गोळा करणे, कॉलेज मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत माहिती गोळा करण्याचे काम न झाल्याने आज ऑफलाइन वर्ग सुरू केले जाणार नाहीत.  आज उद्यामध्ये कॉलेज याबाबत नियोजन करून वेळापत्रक तयार करून ऑफलाइन वर्ग सुरू केले जातील असे अनेक महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

पुण्यात मात्र आज कॉलेज सुरु होण्याची शक्यता धूसरच
पुण्यात मात्र आज कॉलेज सुरु होण्याची शक्यता धूसरच आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून महविद्यालयांना ऐनवेळेस सूचना देण्यात आल्यात. त्यात विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र आज संपतंय. दिवाळी काही दिवसांवर आलीय. पुण्याबाहेरुन शिक्षणासाठी येणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहे. त्यामुळे आज पुण्यातील महाविद्यालयं सुरु होण्याची शक्यता कमीच आहे.

राज्याच्या इतर भागातील कॉलेज कॅम्पस गजबजले
मुंबई, पुण्यातील अनेक महाविद्यालयं प्रत्यक्ष बंदच असले तरी राज्याच्या इतर भागातील कॉलेज कॅम्पस गजबजलेत.  नागपूर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरीतील महाविद्यालयं उघडली आहेत. मागील दीड वर्षे घरुनच ऑनलाईन वर्गात हजेरी लावणाऱ्या विद्य़ार्थ्यांनी प्रत्यक्षात हजेरी कॉलेजमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा असाच होता. वर्गात बसून शिक्षणाचे धडे घेण्याचं वेगळंच समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. कॉलेजच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारी म्हणत मैत्रीच्या आणाभाका घेतल्या जाणार आहेत. मात्र हे सगळं करताना विद्यार्थ्यांना कोरोना नियम आणि सरकारच्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये जाता येणार नाही. तसंच विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही खेळही टाळण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्यात.

नाशिकमध्ये शिक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत
नाशिकच्या नामांकित बी वाय के महाविद्यालयात आज सकाळी प्राचार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत तसेच इतर शिक्षकांनी टाळ्यांच्या गजर करत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आज पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांची तुरळक गर्दी जवळपास सर्वच महाविद्यालयांमध्ये नजरेस पडत असून पुणे विद्यापीठाकडून उशीरा जारी करण्यात आलेली नियमावली हे देखिल यामागे कारण ठरतय. 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरु झाली असून सर्व खबरदारी महाविद्यालय प्रशासनाकडून घेण्यात येते आहे. 

कोल्हापुरातील महाविद्यालयही आजापासून सुरु झाली आहे. दीड वर्षानंतर विद्यार्थी महविद्यालयात आल्यामुळे त्यांचं स्वागत करण्यात आलं.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget