(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला, तर 3 फेब्रुवारीला दिल्लीत पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोराची थंडी आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा बराच घसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी कायम आहे.
ाCold Weather : उत्तर भारतात सध्या जोरदार थंडीची लाट आहे. या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोराची थंडी आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा बराच घसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी कायम आहे. आज धुळे जिल्ह्यात तापमान हे 4.0 अंश सेल्सिअस होते, तर नंदूरबारच्या डोंगराळ भागामध्ये तापमान हे 6 अंश सेल्सिअस होते. तर सपाटी भागात तापमान 9.5 अंश सेल्सिअस आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील तापमानाचा पारा घसरला आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान हे 7.3 अंश सेल्सियस आहे.
विदर्भातील वाशिम जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर गडचिरोलीमध्ये देखील तापमानाचा पारा घसरला असून, तिथे तापमान हे 9.4 अंश सेल्सिअस आहे. तर नांदेड तापमान 11अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कायम असलेल्या थंडीची लाट महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये पसरली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात विदर्भात थंडीची लाट पसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वाधिक कुल
सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर आणखी वाढला आहे. गोंदिया जिल्हात 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाची दिवसेंदिवस घट होत असून थंडीचा जोर वाढत आहे. आज जिल्ह्याचे कमाल तापमान 23.2 अंश तर किमान तापमान 7.4 अंश होते. विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वाधिक थंड ठरला आहे. या शितलहरीचा नागरिकांना आणखी काही दिवस त्रास होणार असल्याचे दिसून येत आहे. थंडीमुळे आता घरातही गरम कपड्याशिवाय राहणे कठीण असून या थंडीचा वृद्धांना अधिक त्रास होताना दिसून येत आहे.
3 फेब्रुवारीला दिल्लीत पावसाची शक्यता
दरम्यान, पुढील २४ तासांत मध्य भारतात किमान तापमानात जास्त बदल होणार नाही. त्यानंतर हळूहळू वाढची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासात मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागात तीव्र थंडीची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यानंतर हळूहळू थंडी कमी होईल असे सांगण्यात आले आहे. दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, या संपूर्ण आठवड्यात राजधानीत पाऊस पडणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र वाऱ्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, संपूर्ण आठवडाभर हवामान स्वच्छ असल्याने सकाळ आणि संध्याकाळी थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, 3 फेब्रुवारीला दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाच्या शक्यतेसह आकाश अंशतः ढगाळ राहील, असे IMD ने म्हटले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 20 आणि 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: