(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ गारठणार; पुढील 24 तास थंडीची लाट
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीची लाट असणार असल्याची माहिती दिली आहे.
Cold Wave in Maharashtra : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडी (Maharashtra Weather) प्रचंड वाढली असून अगदी मुंबईसारख्या शहरांमध्येही थंडी जाणवत आहे. दरम्यान ग्रामीण भागात तर थंडीने कहरच केला आहे. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीची लाट असणार असल्याची माहिती दिली आहे.
या ठिकाणच्या किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार असून रात्री किंवा पहाटेच नाही तर दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या भागात अर्थात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज ही वर्तवण्यात येत आहे.
या जिल्ह्यात तापमान 10 अंशाखाली
हवामान विभागाच्या माहितीनुसार नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे केलं जात आहे. दरम्यान आज (रविवार) देखील उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमान हे 10 अंशांखाली गेले असून जळगावात तर 5 अंश सेल्सिअस आणि नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आलं आहे.
हे ही वाचा -
- Maharashtra Weather Report : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी कायम
- फेक अकाऊंट बनवून मुलीचे अश्लील फोटो काढले, मग केली शरीरसुखाची मागणी; वसई पोलिसांनी चतुराईनं भामट्याला पकडलं
- Pune: पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, 72 तासांत विनयभंग करणाऱ्या आरोपीला सुनावली शिक्षा; हिंजवडी पोलिसांचीही मोठी कामगिरी